इमोला - रविवारी इमोला सर्किटमध्ये झालेल्या शर्यतीत विजय मिळवत लुईस हॅमिल्टनने एमिलिया रोमाग्ना ग्रँड प्रिक्सचा किताब आपल्या नावावर केला. या विजयासह हॅमिल्टनने आपल्या संघाला म्हणजेच मर्सिडीजला सलग सातवे सांघिक जेतेपद मिळवून दिले.
मर्सिडीजचा संघ सलग सात विजेतेपद पटकावणारा पहिला संघ ठरला आहे. त्यांनी फेरारीचा सलग सहा विजेतेपदाचा विक्रमही मोडला आहे. फेरारीने १९९९ ते २००४ या काळात अनुभवी मायकेल शुमाकरसह सलग सहा विजेतेपदे जिंकली होती.