महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Meltwater Champions Tour Finals : प्रज्ञानानंदाचा मेल्टवाॅटर फायनलमध्ये पहिला विजय, एरिगेसी पुन्हा पराभूत - R Praggnanandhaa beat Vietnams Liem Quang Lee

मेल्टवॉटर चॅम्पियन्स टूर फायनल्स बुद्धिबळ स्पर्धेत आर प्रज्ञानानंधाने व्हिएतनामच्या लिम क्वांग लीचा 3-0 असा पराभव ( R Praggnanandhaa beat Vietnam's Liem Quang Lee ) केला. प्रज्ञानानंधाने मेल्टवाॅटरमध्ये आपला पहिला विजय ( Indian Grandmaster R Praggnanandhaa has Win ) नोंदवला आहे. परंतु, अर्जुन एरिगाईसीने तिसऱ्या फेरीत अमेरिकेच्या वेस्ली सोविरुद्ध 0.5-2.5 अशी ( Arjun Erigaisi Suffered his Third Defeat in a Row ) मात केली.

Meltwater Champions Tour Finals
प्रज्ञानानंदाचा मेल्टवाॅटर फायनलमध्ये पहिला विजय

By

Published : Nov 17, 2022, 4:14 PM IST

सॅन फ्रान्सिस्को : भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंधाने गुरुवारी मेल्टवॉटर चॅम्पियन्स टूर फायनल्स बुद्धिबळ स्पर्धेत पहिला विजय ( Indian Grandmaster R Praggnanandhaa has Win ) नोंदवला, तर त्याचा ( R Praggnanandhaa beat Vietnam's Liem Quang Lee ) बरोबर असलेला भारतीय खेळाडू अर्जुन एरिगायसीचा सलग तिसरा पराभव ( Arjun Erigaisi Suffered his Third Defeat in a Row ) झाला. प्रज्ञानंदने तिसर्‍या फेरीत व्हिएतनामच्या लीम क्वांग लीचा 3-0 असा पराभव केला. पण, एरिगेला अमेरिकेच्या वेस्ली सो विरुद्ध 0.5-2.5 असा पराभव पत्करावा लागला.

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावरील मॅग्नस कार्लसनची विजयी घौडदौड :जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनने अझरबैजानच्या शाखरियार मामेदयारोववर 3-0 असा विजय मिळवून आपली विजयी घोडदौड सुरूच ठेवली आहे. तर पोलंडच्या जॅन क्रिस्टोफ डुडाने डच ग्रँडमास्टर अनिश गिरीचा 2.5-0.5 असा पराभव करून सलग तिसरा विजय नोंदवला. आठ खेळाडूंच्या या स्पर्धेत प्रज्ञानानंद (चार गुण) चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तो कार्लसन आणि डुडा (प्रत्येकी 9 गुण) आणि गिरी (04 गुण) यांच्या मागे आहे.

प्रज्ञानानंदने पहिल्या गेममध्ये 41 चालींमध्ये लीचा पराभव केला : सतरा वर्षांच्या प्रज्ञानानंदने पहिल्या गेममध्ये 41 चालींमध्ये लीचा पराभव केला आणि नंतर काळ्या तुकड्यांसह खेळत 46 चालींमध्ये दुसरा गेम जिंकला. तिसऱ्या गेममध्ये भारतीय ग्रँडमास्टरने 53 चालींमध्ये सामना जिंकला. पुढच्या फेरीत त्याची लढत सोशी होईल. एरिगेने सोविरुद्ध बरोबरी साधून सुरुवात केली. परंतु, पुढील दोन गेम गमावून सामनाही गमावला. तिसर्‍या फेरीनंतरही अ‍ॅरिगेसी पहिल्या स्कोअरच्या प्रतीक्षेत आहे. चौथ्या फेरीत त्याचा सामना मामेद्यारोवशी होईल.

जो खेळाडू सर्वाधिक गुण गोळा करेल तो विजेता :ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवली जात आहे. जो खेळाडू सर्वाधिक गुण गोळा करेल तो विजेता होईल. मेल्टवॉटर चॅम्पियन्स टूरवरील स्पर्धांच्या मालिकेनंतर, शीर्ष आठ खेळाडूंनी अंतिम फेरी गाठली. टूर फाइल्सची एकूण बक्षीस रक्कम दोन लाख 10 हजार डॉलर्स आहे. राउंड रॉबिनमधील प्रत्येक विजयाला 7500 डाॅलर मिळेल.

ABOUT THE AUTHOR

...view details