महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 28, 2019, 4:28 PM IST

ETV Bharat / sports

निखतला हरवल्यानंतर मेरीने धुडकावला हात, पाहा व्हिडिओ

सहा वेळा विश्वविजेती बॉक्सर मेरी कोम आता ५१ किलो गटातून भारताकडून ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा खेळणार आहे. या प्रकरणानंतर 'मेरीच्या अशा वागण्यामुळे दु:ख झाले, तिने रिंगमध्येही मला अपशब्द वापरले', असे म्हटले आहे. मेरीनेही 'त्यावेळी मी थोडी रागात होते, असे म्हटले आहे.

Mary Kom refuses to shake Nikhat Zareen's hands after beating her, Watch video
निखतला हरवल्यानंतर मेरीने धुडकावला हात, पाहा व्हिडिओ

नवी दिल्ली -भारताची स्टार बॉक्सिंगपटू मेरी कोम आणि निखत झरीन यांच्यातील महत्वाचा सामना आज पार पडला. या सामन्यात विश्वविजेती बॉक्सर मेरी कोमने झरीनचा ९-१ ने पराभव केला. सामन्यानंतर, मेरीने निखतशी 'हँडशेक' धुडकावून लावला.

हेही वाचा -VIDEO : स्टेनच्या गोलंदाजीवर एका षटकात ०,६,६,४,४ त्यानंतर मग...

सहा वेळा विश्वविजेती बॉक्सर मेरी कोम आता ५१ किलो गटातून भारताकडून ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा खेळणार आहे. या प्रकरणानंतर 'मेरीच्या अशा वागण्यामुळे दु:ख झाले, तिने रिंगमध्येही मला अपशब्द वापरले', असे म्हटले आहे. मेरीनेही 'त्यावेळी मी थोडी रागात होते, असे म्हटले आहे.

मेरी कोम आणि निखत झरीन यांच्यातील बहुचर्चित 'सामना' आज (शनिवार) पार पडला. पुढील वर्षी चीनमध्ये ३ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या दरम्यान, ऑलिंम्पिक पात्रता स्पर्धेचे सामने खेळवण्यात येणार आहेत. मेरी या पात्रता स्पर्धेत ५१ किलो गटात भारताचे नेतृत्व करेल.

दरम्यान, निखत झरीनने चीनमध्ये होणाऱ्या ऑलिंम्पिक पात्रता स्पर्धेसाठी संघ निवडताना माझी मेरी कोमशी चाचणी लढत खेळवावी, अशी मागणी केली होती. निखतने क्रीडामत्र्यांनांही याविषयी पत्र लिहिले होते.

ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या ट्रायल सामन्यात ५१ किलो वजनी गटात निखत झरीनने ज्योती गुलियाला १०-० अशी मात देत तर मेरी कोमने रितू ग्रेवालचा १०-० ने पराभव करत अंतिम फेरी गाठली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details