ग्रेटर नोएडा - गौतम बुद्ध युनिव्हर्सिटी इनडोअर स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मेरी कोमने बिग बाउट बॉक्सिंग लीगमध्ये पंजाबला विजय मिळवून दिला. बॉम्बे बुलेट्सवर पंजाब पँथर्सने ५-२ ने विजय मिळवला. मेरी कोमने इंग्रीड लोरेनाचा पराभव केला.
हेही वाचा -टी-२० विश्व करंडकासाठी टीम इंडियात फक्त एक गोलंदाजाची जागा शिल्लक - विराट
मेरी कोमने रिओ ऑलिम्पिक ब्राँझपदक विजेती इंग्लंड लोरेना हिचा ५-० असा पराभव करून संघाचा विजय निश्चित केला. मनोजकुमारच्या पराभवामुळे पंजाबचा संघ बॅकफूटवर गेला होता. मात्र मेरी कोमने संघाचा ताबा घेतला आणि विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, अब्दुल मलिक खालाकोव्ह आणि पीएल प्रसाद यांनी पंजाबला शानदार सुरुवात दिली. युवा ऑलिम्पिक चॅम्पियन अब्दुल मलिकने पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात आशियाई स्पर्धेत रौप्यपदक विजेता कविंदर बिष्टला पराभूत केले.