नवी दिल्ली -कोरोना व्हायरस या महामारीचा सामना करण्यासाठी अनेक जण पुढे सरसावले आहेत. या मदतीच्या लाटेत भारताची महिला बॉक्सिंगपटू मेरी कोमनेही आपला पुढाकार दर्शवला आहे. राज्यसभा खासदार असेलल्या मेरीने आपल्या खासदार निधीतून एक कोटींची मदत जाहीर केली आहे.
कोरोनाला 'पंच' देण्यासाठी विश्वविजेती मेरी कोम मैदानात! - मेरी कोम लेटेस्ट न्यूज
या मदतीची माहिती मेरीने आपल्या ट्विटर अकाउंटद्वारे दिली. मेरी आपल्या एक महिन्याचे वेतन पंतप्रधान सहाय्यता निधीला देणार आहे. घरी राहा, सुरक्षित राहा असे आवाहनही मेरीने यावेळी केले.
कोरोनाला 'पंच' देण्यासाठी विश्वविजेती मेरी कोम मैदानात!
या मदतीची माहिती मेरीने आपल्या ट्विटर अकाउंटद्वारे दिली. मेरी आपल्या एक महिन्याचे वेतन पंतप्रधान सहाय्यता निधीला देणार आहे. घरी राहा, सुरक्षित राहा असे आवाहनही मेरीने यावेळी केले.
कोरोनामुळे या महिन्याच्या सुरूवातीला मेरी संकटात सापडली होती. विदेशातून आल्यानंतर, मेरीने १४ दिवसांच्या एकांतवासाच्या नियमाचे उल्लंघन केले होते. मेरीने राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.