महाराष्ट्र

maharashtra

नेमबाजपट्टू मनू भाकरने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पटकावले सुवर्णपदक

By

Published : Nov 6, 2019, 4:03 PM IST

भाकरने २४४.३ गुणांसह अंतिम सामन्यात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक जिंकले.  या स्पर्धेतील भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक आहे.

नेमबाजपटू  मनु भाकरने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पटकावले सुवर्णपदक

दोहा - भारताची नेमबाजपट्टू मनू भाकरने सध्या सुरू असलेल्या १४ व्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक नावावर केले आहे. महिलांच्या १० मीटर एअर पिस्टल स्पर्धेत तिने ही कामगिरी केली.

हेही वाचा -बांगलादेशी खेळाडूंना दिल्लीच्या प्रदूषणाचा फटका, तब्येत बिघडली

भाकरने २४४.३ गुणांसह अंतिम सामन्यात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेतील भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक आहे. मनुने यापूर्वीच आगामी ऑलिम्पिक स्पर्धेचा कोटा मिळविला आहे. यावर्षी मे महिन्यात झालेल्या म्युनिक येथील वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेत मनुने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत चौथे स्थान मिळवून ऑलिम्पिकचा कोटा जिंकला होता.

यापूर्वी मंगळवारी पार पडलेल्या पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत भारताच्या दीपक कुमारने कांस्यपदक जिंकले. या पदकामुळे दीपकने पुढील वर्षी टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचा कोटा मिळविला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details