नवी दिल्ली - १८ वर्षीय भारताची उदयोन्मुख महिला नेमबाजपटू मनु भाकरने कोरोना व्हायरसविरूद्ध लढ्यात हरियाणाच्या मुख्यमंत्री मदत निधीला 1 लाख रुपये देण्याचे ठरवले आहे.
कोरोना युद्ध : १८ वर्षाच्या मनु भाकरकडून १ लाखाची मदत जाहीर - manu bhaker latest news
अशी वेळ आली आहे जेव्हा देशातील लोकांचे जीवन सर्वात महत्त्वाचे आहे. आपण सर्वांनी जीव वाचवण्यासाठी जे काही केले पाहिजे ते करावे. मी हरियाणा कोरोना केअर फंडात १ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा करते. मला आशा आहे की आपणही या आपत्तीत काही योगदान देऊन हातभार लावू शकता, असे मनुने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

कोरोना व्हायरसविरूद्धच्या लढाईत अनेकजण विविध मार्गाने मदत करत आहेत. बीसीसीआयनेही ५१ कोटींची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश, २१ दिवसांसाठी लॉकडाऊन केला आहे. यानंतर मोदींनी कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी मदतीचे आवाहन केले आहे.