नवी दिल्ली - चीनमध्ये रंगलेल्या आईएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या नेमबाजांनी इतिहास रचला. भारतीय नेमबाज मनू भाकेर, एल्वनिल वलरिवन आणि दिव्यांश पनवार यांनी वेगवेगळ्या गटातून सुवर्णपदकाची कमाई केली. मनूने १० मीटर एअर पिस्तुल आणि एल्वनिलने १० मीटर एअर रायफल प्रकारात पदक पटकावले. तर १७ वर्षीय दिव्यांश सिंग पनवार यानेही १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.
मनूने १० मीटर एअर पिस्तुल प्रकाराच्या अंतिम फेरीत २४४.७ गुणांची कमाई करत प्रथम क्रमांक पटकावला. तर या प्रकारात सर्बियाच्या खेळाडूला रौप्य तर चीनच्या खेळाडूला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
- https://twitter.com/OfficialNRAI/status/1197397014226571264
दुसरीकडे एल्वनिलने १० मीटर एअर रायफल प्रकारात अंतिम फेरीत २५०.८ गुणांची कमाई केली. या प्रकारात तैवानच्या नेमबाजपटूला रौप्य तर रोमानियाच्या खेळाडूला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
भारताचा १७ वर्षीय दिव्यांश सिंग पनवार याने १० मीटर एअर रायफल प्रकरात सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने या प्रकारात अंतिम फेरीत २५०.१ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावले.