महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा : कनिष्ठ आणि वरिष्ठ गटात मनु भाकरने पटकावले सुवर्ण - मनू भाकेर लेटेस्ट न्यूज

महिलांच्या पिस्तूल क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या मनुने दोन्ही स्पर्धांच्या संयुक्त पात्रतेत ५८८ गुण मिळवले. या स्पर्धेतील वरिष्ठ गटात देवंशी धामाने २३७.८ गुणांसह रौप्य तर यशस्विनीसिंग देसवालने २१७.७ गुणांसह कांस्यपदक जिंकले.

Manu Bhaker, Anish Bhanwala Win Gold Medals in Senior as well as Junior Events in Nationals
राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा : कनिष्ठ आणि वरिष्ठ गटात मनु भाकरने पटकावले सुवर्ण

By

Published : Dec 24, 2019, 8:36 PM IST

भोपाळ -भारतीय युवा नेमबाजपटू मनु भाकरने येथील राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत पराक्रम केला. तिने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारातील ज्येष्ठ व कनिष्ठ गटात सुवर्णपदक जिंकले. १७ वर्षीय मनुने २४३ गुणांसह कनिष्ठ गटात आणि वरिष्ठ गटातील अंतिम फेरीत २४१.५ गुणांसह जेतेपद जिंकले.

हेही वाचा -पी.व्ही. सिंधू अत्यंत असंवेदनशील; गरज असेल तेव्हाच बोलते, माजी प्रशिक्षकाचे खळबळजनक आरोप

महिलांच्या पिस्तूल क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या मनुने दोन्ही स्पर्धांच्या संयुक्त पात्रतेत ५८८ गुण मिळवले. या स्पर्धेतील वरिष्ठ गटात देवंशी धामाने २३७.८ गुणांसह रौप्य तर यशस्विनीसिंग देसवालने २१७.७ गुणांसह कांस्यपदक जिंकले.

यशस्विनीने संयुक्त पात्रतेत ५७७ गुण मिळवले असून तिने आणि मनू भाकरने यापूर्वीच टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचा कोटा जिंकला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details