ब्राझील -भारतीय नेमबाजपटूंनी ब्राझीलच्या रिओ डि जानेरो येथे सुरु असलेल्या शूटिंग वर्ल्ड कप स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवला आहे. या स्पर्धेच्या मिश्र गटात १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात मनु भाकर आणि सौरभ चौधरी या नेमबाजांनीही सुवर्णवेध घेतला आहे.
हेही वाचा -तिसरा सेट न खेळताच जोकोविच पडला स्पर्धेबाहेर
रोमांचक झालेल्या या अंतिम सामन्यामध्ये मनु भाकर आणि सौरभ चौधरी यांच्या जोडीने भारताच्याच यशस्विनी देसवाल आणि अभिषेक वर्माला १७-१५ ने पछाडले. दुसरीकडे, १० मीटर एअर रायफल स्पर्धेच्या मिश्र गटात अपूर्वी चंदेला आणि दीपक कुमार यांनी सुवर्णपदक मिळवले आहे. याच स्पर्धेत भारताच्या अंजुम मौदिगल आणि दिव्यांश पंवार यांनी कांस्य पदक पटकावले आहे.