महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

शरत-मनिका जोडीचे मिश्र दुहेरीत ऑलिम्पिक तिकिट पक्के

भारताची टेबल टेनिसपटू मनिका बत्रा आणि शरत कमल या जोडीने टोकियो ऑलिम्पिकचे तिकिट मिळवले आहे.

manika-batra-and-sharath-kamal-book-olympic-mixed-doubles-spot
शरत-मनिका जोडीचे मिश्र दुहेरीत ऑलिम्पिक तिकिट पक्के

By

Published : Mar 20, 2021, 4:00 PM IST

मुंबई - भारताची टेबल टेनिसपटू मनिका बत्रा आणि शरत कमल या जोडीने टोकियो ऑलिम्पिकचे तिकिट मिळवले आहे. या जोडीने ऑलिम्पिक क्वालिफिकेशन स्पर्धेच्या, मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत रोमांचक सामन्यात विजय मिळवला. या दोघांनी कोरियाच्या सांग सु ली आणि जिही जनियोन या जोडीचा ४-२ (८-११, ६-११, ११-५, ११-६, १३-११, ११-८) असा पराभव केला.

बत्रा आणि कमल या जोडीने या विजयासह टोकियो ऑलिम्पिकचे तिकिट मिळवले. दरम्यान, शरत आणि मनिका या दोघांनी एकेरीत याआधीच ऑलिम्पिक कोटा मिळवला आहे. आता त्यांनी मिश्र दुहेरीत ही कामगिरी केली.

मनिकाची कामगिरी -

मनिकाने ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत चार पदकं जिंकली आहेत. तिने भारताला सांघिक गटात सुवर्णपदक मिळवून दिले होते. त्यानंतर महिला एकेरी विभागात सुवर्णपदक जिंकत मनिकाने इतिहास रचला होता. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली होती. मनिकाने मौमा दासबरोबर महिला दुहेरीत रौप्यपदक पटकावले होते, त्याचबरोबर मिश्र दुहेरीमध्ये कांस्यपदक पटकावले होते.

हेही वाचा -बॉस्फोरस बॉक्सिंग: विश्वविजेत्या खेळाडूला दणका देत निखत झरीन उपांत्यपूर्व फेरीत

हेही वाचा -पराभव जिव्हारी; बबिता फोगाटच्या मामेबहिणीची गळफास घेऊन आत्महत्या

ABOUT THE AUTHOR

...view details