कॅनडा -भारताचा युवा टेबल टेनिसपटू मानव ठक्करने रविवारी आयटीटीएफ चॅलेंज प्लस बेनेक्स व्हिगो नॉर्थ अमेरिकन ओपनचे विजेतेपद जिंकून इतिहास रचला. दुसर्या मानांकित मानवने पुरुषांच्या अंडर -२१ प्रकारात अर्जेंटिनाच्या मार्टिन बेंटनकोरला ११-३, ११-५, ११-६ असे पराभूत करून विजेतेपद पटकावले.
हेही वाचा -संजू..संजू...! घोषणाबाजीत 'लोकल बॉय' सॅमसनचे स्वागत, व्हिडिओ व्हायरल
२०१७ नंतर विजेतेपद जिंकणारा मानव हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. आयटीटीएफ वर्ल्ड टूर अंडर -२१ प्रकारातील पुरुष एकेरीत हे विजेतेपद मिळविणारा १९ वर्षीय मानव हा चौथा भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी हरमीत देसाई, गुणसेकर सथियान आणि सौम्यजित घोष यांनी विजेतेपद पटकावले आहेत.
आयटीटीएफ चॅलेंज सीरिज कॅनडामध्ये प्रथमच आयोजित करण्यात आली होती. २०१८ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या संघातील खेळाडू मानवने उपांत्य फेरीच्या सामन्यात अर्जेंटिनाच्या होरासिओ सिफुएन्टेसला ११-५ आणि ११-९ असे पराभूत केले, तर उपांत्य फेरीच्या लढतीत त्याने लोरेन्झो सँटियागो १२-१०, ७-११, ११-६ असे पराभूत केले होते.