महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Malaysia Masters 2022 : सिंधू, प्रणीत आणि कश्यप दुसऱ्या फेरीत दाखल, सायना पहिल्या फेरीतून बाहेर - बॅडमिंटन न्यूज

पीव्ही सिंधूने मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी सायना नेहवाल पहिल्या फेरीत पराभूत होऊन बाहेर ( Saina Nehwal out of Malaysia Masters Badminton ) पडली.

sindhu
सिंधू

By

Published : Jul 6, 2022, 7:57 PM IST

क्वालालंपूर: दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने ( Two-time Olympic medalist PV Sindhu ) बुधवारी मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या फेरीतील खडतर लढतीत चीनच्या हि बिंग झियाओचा पराभव करून महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पण सायना नेहवाल पहिल्या फेरीत पराभूत झाल्याने सलग दुसऱ्या स्पर्धेतून बाहेर पडली.

सातव्या मानांकित सिंधूने सुमारे एक तास चाललेल्या लढतीत बिंग जिओचा ( Sindhu defeated Bing Jio ) 21-13, 17-21, 21-15 असा पराभव केला आणि दुसरी फेरी गाठली. या विजयासह, जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या सिंधूने गेल्या महिन्यात इंडोनेशिया ओपन सुपर 1000स्पर्धेच्या पहिल्या फेरीत बिंग जिओविरुद्धच्या पहिल्या फेरीतील पराभवाचा बदला घेतला. चीनच्या खेळाडूचा सिंधूविरुद्ध विजय-पराजयाचा विक्रम अजूनही 10-9 असा आहे.

दुसरीकडे लंडन ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती सायनाला ( Bronze medalist Saina Nehwal ) पहिला गेम जिंकूनही दक्षिण कोरियाच्या किम गा युनकडून 21-16, 17-21, 14-21असा पराभव पत्करावा लागला. जागतिक क्रमवारीत 24व्या स्थानी असलेली सायनाही पहिल्या फेरीत पराभूत होऊन गेल्या आठवड्यात मलेशिया ओपन सुपर 750 स्पर्धेतून बाहेर पडली होती. पुरुष एकेरीत बी साई प्रणीत आणि पारुपल्ली कश्यप यांनीही विरुद्ध विजय नोंदवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

प्रणीतने ग्वाटेमालाच्या केविन कॉर्डनचा अर्ध्या तासापेक्षा कमी वेळेत एकतर्फी लढतीत 21-8, 21-9 असा पराभव केला. तर कश्यपने एक गेम गमावल्यानंतर पुनरागमन करत स्थानिक स्पर्धक टॉमी सुगियार्तोचा 16-21, 21-16, 21-16असा पराभव ( Kashyap defeated Tommy Sugiarto ) केला. समीर वर्माला मात्र चौथ्या मानांकित चायनीज तैपेईच्या चौ तिएन चेनकडून 21-10, 12-21, 14-21 असा पराभव पत्करावा लागला.

हेही वाचा -Wimbledon 2022 : 'नदाल विम्बल्डन खेळायला आला तेव्हा त्याला खात्री नव्हती, पण आता तो फेव्हरेट आहे'

ABOUT THE AUTHOR

...view details