नवी दिल्ली : 2023 हे वर्ष भारतीय खेळाडूंसाठी अतिशय व्यस्त वेळापत्रक असणार आहे. (Major Sports Events in 2023) भारतीय क्रिकेट संघ या वर्षी अनेक मालिकांमध्ये खूप व्यस्त असणार आहे, तर एकदिवसीय विश्वचषक सोबतच जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (World Test Championship) सारखा कार्यक्रम आहे. (Indian Players in 2023 ) जर सर्व काही सुरळीत झाले तर टीम इंडियाला आशिया कप खेळायला नक्कीच आवडणार आहे.(ODI World Cup 2023 ) दुसरीकडे, हॉकी विश्वचषकासोबतच यंदा नेमबाजी विश्वचषक जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे, (Indian Sports In 2023) ज्यामध्ये चाहत्यांना टीम इंडियाच्या खेळाडूंकडून नक्कीच चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे, (World Cup 2023) तसेच विजेतेपदही मिळणार आहे.
१५व्या हॉकी विश्वचषकाचे आयोजन:प्रमुख स्पर्धांपैकी १५व्या हॉकी विश्वचषकाचे आयोजन ओडिशामध्ये १३ जानेवारी ते २९ जानेवारी दरम्यान केले जात आहे. या हॉकी विश्वचषकात 16 देश सहभागी होणार आहेत. ऑस्ट्रेलियासोबतच टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाला तब्बल 48 वर्षांनंतर हॉकी विश्वचषक जिंकण्याची मोठी संधी आहे.
महिला T20 विश्वचषक स्पर्धा: महिला T20 विश्वचषक 10 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. १० फेब्रुवारीपासून दक्षिण आफ्रिकेत महिला टी-२० विश्वचषक होणार आहे. महिला २०-२० विश्वचषकाच्या आठव्या आवृत्तीत १० देशांतील खेळाडू सर्वोत्तम प्रयत्न करणार आहे. ऑस्ट्रेलियाने मागील दोन महिला टी-२० विश्वचषक जिंकले आहेत. 2020 महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. यावेळी भारताला बदला घेण्याची तसेच चॅम्पियन बनण्याची संधी आहे.