हैद्राबाद :भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आहे. आता तो निर्माता झाला आहे. यासोबतच महेंद्रसिंग धोनीने धोनी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत 'एलएसजी: लेट्स गेट मॅरीड' नावाच्या पहिल्या चित्रपटाची घोषणा केली आहे. हा एक तमिळ चित्रपट आहे, जो लवकरच चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
धोनीच्या पहिल्या चित्रपटाचे टायटल लूक पोस्टर आले समोर :धोनी एंटरटेनमेंटच्या अधिकृत ट्विटर हँडलवर चित्रपटाचा टायटल लूक मोशन पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'आम्ही धोनी एंटरटेनमेंटचे पहिले प्रोडक्शन टायटल शेअर करताना खूप उत्सुक आहोत. या चित्रपटाच्या शीर्षकाच्या घोषणेसोबतच या चित्रपटातील कलाकारांचाही खुलासा करण्यात आला आहे. या चित्रपटात हरीश कल्याण, इवाना, नादिया आणि योगी बाबूसारखे स्टार्स दिसणार आहेत.