रायगड- राजस्थान कबड्डी असोसिएशनच्या वतीने ०२ ते ०६ मार्च या कालावधीत जयपूर येथे ६७ व्या वरिष्ठ गट पुरुष आणि महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला भारतीय कबड्डी महासंघाची मान्यता असून महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने या स्पर्धेसाठी आपला पुरुष व महिला कबड्डी संघ जाहीर केला आहे. या संघाचे सराव शिबीर अलिबाग तालुक्यातील आवास याठिकाणी पार पडले. आज दोनही संघ अलिबाग येथून राजस्थानसाठी रवाना होणार आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्यवाहक अॅड. आस्वाद पाटील यांनी या संघांना शुभेच्छा दिल्या आहेत.
अलिबाग तालुक्यातील आवास या ठिकाणी पुरुष व महिला कबड्डी संघाने १५ दिवस कसून सराव केला. पुरुष संघाचे प्रशिक्षक आशिष म्हात्रे तर महिला संघाच्या सिमरन गायकवाड यांनी खेळाडूंकडून सराव करून घेतला. दोन्ही संघ राजस्थान येथे होणाऱ्या स्पर्धेत उत्तम कामगिरी करतील असा विश्वास प्रशिक्षकांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा : महाराष्ट्राचा पुरुष व महिला संघ राजस्थानकडे आज होणार रवाना - भारतीय कबड्डी महासंघ
पुरुष व महिला कबड्डी संघाचे सराव शिबीर अलिबाग तालुक्यातील आवास याठिकाणी आयोजित करण्यात आले होते. आज दोनही संघ अलिबाग येथून राजस्थानसाठी रवाना होणार आहे.
राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा पुरुष व महिला संघ राजस्थानकडे आज होणार रवाना
रत्नागिरीच्या स्वप्नील शिंदेकडे पुरुष, तर पुण्याच्या अंकिता जगतापकडे महिला संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली आहे. यंदाच्या महाराष्ट्राच्या दोन्ही संघात नवोदितांचा भरणा अधिक आहे.
- १) स्वप्नील शिंदे – ( संघनायक)-रत्नागिरी, २) शुभम शिंदे – रत्नागिरी, ३) रोहन बन्न – सांगली, ४) बिपीन थळे – रायगड, ५) आकाश कदम – मुंबई उपनगर, ६) सुशांत साईल – मुंबई शहर, ७) तुषार पाटील – कोल्हापूर, ८) अजिंक्य पवार – रत्नागिरी, ९) पंकज मोहिते – मुंबई शहर, १०) मनोज बोन्द्रे – पुणे, ११) संकेत सावंत – मुंबई शहर, १२) महारुद्र गर्जे – बीड.
- प्रशिक्षक - आशिष म्हात्रे – रायगड, व्यवस्थापक - संतोष भोसले – रत्नागिरी.
असा आहे महाराष्ट्राचा महिला संघ -
- १) अंकिता जगताप - (संघनायिका) – पुणे, २) पूजा शेलार – पुणे, ३) पौर्णिमा जेधे – मुंबई शहर, ४) सायली जाधव – मुंबई उपनगर, ५) सुवर्णा लोखंडे – औरंगाबाद, ६) सोनाली हेळवी – सातारा, ७) मेघा परब – मुंबई शहर, ८) तेजस्वी पाटेकर – मुंबई उपनगर, ९) ऐश्वर्या काळे-ढवण – पालघर, १०) श्रद्धा चव्हाण – पुणे, ११) पूजा जाधव – मुंबई उपनगर, १२) निकिता कदम – ठाणे.
- प्रशिक्षिका - सिमरन गायकवाड – ठाणे, व्यस्थापिका - अनघा कांगणे – रत्नागिरी
Last Updated : Feb 29, 2020, 6:26 AM IST