महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

अहमदनगर : महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याचा भव्य नागरी सत्कार - ahmednagar NEWS

अकोले बस स्थानक परिसरात पार पडलेल्या नागरी सत्कार समारंभाराला माजी मंत्री मधुकर पिचड, वैभव पिचड, सीताराम गायकर, प्रसिध्द मल्ल प्रशिक्षक काका पवार यांची उपस्थिती होती. सदगीरसह यावेळी नुकतेच पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या बीजमाता राहिबाई पोपेरे यांचाही सत्कार करण्यात आला.

maharashtra kesari harshvardhan sadgir grand welcome in ahmednagar
अहमदनगर : महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याचा भव्य नागरी सत्कार

By

Published : Jan 30, 2020, 7:44 PM IST

Updated : Jan 30, 2020, 8:06 PM IST

अहमदनगर - जिह्यातील कोंभाळणे गावाचा सुपूत्र महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन जाधव याचे अकोल्यात जंगी मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. यावेळी त्याचा ११ लाख रुपयांचा धनादेश देत भव्य नागरी सत्कार माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या हस्ते करण्यात आला.

अकोले बस स्थानक परिसरात पार पडलेल्या नागरी सत्कार समारंभाराला माजी मंत्री मधुकर पिचड, वैभव पिचड, सीताराम गायकर, प्रसिध्द मल्ल प्रशिक्षक काका पवार यांची उपस्थिती होती. सदगीरसह यावेळी नुकतेच पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या बीजमाता राहिबाई पोपेरे यांचाही सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याचा भव्य नागरी सत्कार...

हर्षवर्धन सदगीरचे महात्मा फुले चौकात आगमन होताच, अगस्ती व मॅार्डन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात त्याची भव्य मिरवणूक काढली. या मिरवणूकीला अकोला तालुक्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

हेही वाचा -बिबट्याला पाहून हृदयविकाराचा झटक्याने महिलेचा मृत्यू; कुटुंबीयांची मदतीची मागणी

हेही वाचा -अहमदनगरमध्ये शेतकऱ्यांकडून 'समृद्धी'च्या कामाला ब्रेक; तहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर पुन्हा सुरुवात

Last Updated : Jan 30, 2020, 8:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details