पुणे -राज्य कुस्तीगीर संघटनेच्यावतीने 63 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी राज्यस्तरीय वरिष्ठ गट कनिष्ठ गट तसेच कुमार गट, मुलींच्या स्पर्धा घेतल्या जातात. राज्यातील 34 जिल्हा कुस्तीगीर संघ आणि अकरा महानगरपालिका संघ हे राज्य कुस्तीगीर संघाशी संलग्न आहेत.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवर दृष्टिक्षेप - महाराष्ट्र केसरी 2020
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना महाराष्ट्र केसरी स्पर्धेची विस्तृत माहिती दिली.
इतिहास
या 45 संघटनांचे मातीतील संघ तसेच गादी अर्थात मॅटचे संघ राज्य कुस्तीगीर संघटनेच्या स्पर्धांमध्ये सहभागी होतात. प्रत्येक प्रकारात आठ वजनी गट असतात आणि आंतरराष्ट्रीय नियमांप्रमाणे या स्पर्धा खेळवल्या जातात. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना महाराष्ट्र केसरी स्पर्धेची विस्तृत माहिती दिली.