महाराष्ट्र केसरी : शैलेशच्या विजयासाठी ग्रामस्थांनी घातलं भीमाशंकरला साकडं - महाराष्ट्र केसरी २०२०
शैलेश लातूर जिल्ह्याचे तर हर्षवर्धन नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करत आहे. या सामन्यात शैलेश विजयी व्हावा, यासाठी त्यांच्या गावातील ग्रामस्थांनी कुलदैवत भीमाशंकराला साकडे घातले आहे. टाका गावाच्या ग्रामस्थांशी बातचित केली आहे, आमचे प्रतिनिधी राजेंद्र खराडे यांनी...
लातूर- म्हाळूंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित ६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या खुल्या गटाच्या अंतिम लढतीला थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. गादी व माती अशा दोन्ही विभागातून अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या तालमीतील मल्ल हर्षवर्धन सदगीर आणि शैलेश शेळके यांच्यात अंतिम लढत होणार आहे. दोघेही महाराष्ट्र केसरी किताबासाठी आखाड्यात आमनेसामने उतरणार आहेत. शैलेश लातूर जिल्ह्याचे तर हर्षवर्धन नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करत आहे. या सामन्यात शैलेश विजयी व्हावा, यासाठी त्यांच्या गावातील ग्रामस्थांनी कुलदैवत भीमाशंकराला साकडे घातले आहे. टाका गावाच्या ग्रामस्थांशी बातचित केली आहे, आमचे प्रतिनिधी राजेंद्र खराडे यांनी...