महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडूंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिनंदन - राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2020

केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालय यांच्याकडून जाहीर करण्यात आलेले हे पुरस्कार आज देण्यात आले. कोरोनामुळे राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराची जुनी परंपरा मोडित निघत हा सोहळा ऑनलाइन पार पडला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावतीने हे पुरस्कार देण्यात आले.

maharashtra cm uddhav thackeray congratulates national sports award winning players
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडूंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिनंदन

By

Published : Aug 29, 2020, 3:04 PM IST

मुंबई -क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडूंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. शिवाय, त्यांनी हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करत राष्ट्रीय क्रीडा दिनाच्याही शुभेच्छा दिल्या आहेत.

केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालय यांच्याकडून जाहीर करण्यात आलेले हे पुरस्कार आज देण्यात आले. कोरोनामुळे राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराची जुनी परंपरा मोडित निघत हा सोहळा ऑनलाइन पार पडला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावतीने हे पुरस्कार देण्यात आले. यात भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान असलेला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, पॅरालिम्पिकपटू मारियाप्पन थांगावेलू, हॉकीपटू राणी रामपाल यांना देण्यात आला. रोहित शर्मा आणि विनेश फोगाट या सोहळ्याला अनुपस्थित होते.

महाराष्ट्रातील खेळाडू आणि संस्थांनी आपल्या उत्कृष्ट क्रीडा कामगिरीने राज्याच्या क्रीडा गौरवात अभिमानास्पद भर घातली आहे, असे नमूद करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे तसेच देशातील अन्य राज्यातील द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार आणि तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय शौर्य पुरस्कारप्राप्त खेळाडूंचेही अभिनंदन केले आहे.

विविध क्रीडा प्रकारातील पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रातील खेळाडू -

  • अर्जुन पुरस्कार - अजय सावंत (घोडेस्वारी), राहूल आवारे (कुस्ती), सारिका काळे (खो-खो), दत्तू भोकनळ (नौकानयन), मधुरिका पाटकर (टेबल टेनिस), सुयश जाधव (पॅरास्विमिंग).
  • ध्यानचंद पुरस्कार - प्रदीप गंधे (बॅडमिंटन), तृप्ती मुरगुंडे (बॅडमिंटन).
  • राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार - लक्ष्य इन्स्टिट्यूट (पुणे) आणि इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टस्‌ मॅनेजमेंट (मुंबई).

ABOUT THE AUTHOR

...view details