बाकू- विजेता होण्यासाठी टायब्रेकरमध्ये २५-२५ मिनिटांचे दोन सामने खेळवण्यात येतात. यातील पहिला सामना कार्लसन याने जिंकला होता. तर दुसरा सामना प्रज्ञानंद याला जिंकणे अनिवार्य होते. पण दुसरा सामना अनिर्णित राहिला. अखेर कार्लसन बुद्धिबळाचा नवा विश्वविजेता ठरला. (Chess World Cup Final 2023) (FIDE World Cup 2023)
प्रज्ञानंद इतिहास रचण्यापासून मुकला - भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदचा अंतिम सामन्यात टायब्रेकरमध्ये पराभव झाला. या पराभवामुळे भारताचा प्रज्ञानंद इतिहास रचण्यापासून मुकला आहे. पहिल्या टायब्रेकरपर्यंत प्रज्ञानंदने कार्लसनला कडवी फाईट दिली होती, पण दुसऱ्या टायब्रेकरमध्ये कार्लसनने चांगला खेळ करत प्रज्ञानंदचा पराभव केला.
टायब्रेकरमधील पहिले दोन सामने अनिर्णित - रमेशबाबू प्रज्ञानंदनं सोमवारी जोरदार खेळाचं प्रदर्शन केलं. अमेरिकन ग्रँडमास्टर फॅबियानो कारुआनाचा पराभव करत भारतीय युवा ग्रँडमास्टर प्रज्ञानंदनं या खेळावर आपलं वर्चस्व सिद्ध केलं. या सामन्यात प्रज्ञानंदनं अमेरिकन ग्रँडमास्टर फॅबियानो कारुआनाचा 3.5-2.5 असा पराभव केला होता. पहिले दोन टायब्रेक सामने अनिर्णित होते. मात्र, तिसर्या सामन्यात प्रज्ञानंदनं कारुआनाचा पराभव करून पुढचा सामना बरोबरीत सोडवला.
मोठ्या बहिणीकडून प्रेरणा - भारतीय युवा बुद्धीपळपटू रमेशबाबू प्रज्ञानंदनं अत्यंत कमी कालावधीत यश मिळवलं. रमेशबाबू प्रज्ञानंद यानं त्याच्या मोठ्या बहिणीकडून प्रेरणा घेत बुद्धीबळ खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर अवघ्या तिसऱ्यात वर्षी त्यानं बुद्धीबळाच्या खेळाला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवायला सुरुवात केली. त्यामुळे रमेशबाबू प्रज्ञानंद हा आपल्या यशाचं श्रेय आपली बहीण वैशाली हिला देतो. रमेशबाबू प्रज्ञानंद याला टीव्हीवर कार्टून पाहण्याची सवय होती. त्यामुळे वैशाली हिने रमेशबाबू याची ही सवय सोडवण्यासाठी बुद्धीबळाचा खेळ शिकवल्याचं प्रज्ञानंदनं स्पष्ट केलं आहे.
टीव्हीवर कार्टून पाहण्याचा होता छंद - भारतीय बुद्धीबळपटू रमेशबाबू प्रज्ञानंद याला टीव्हीवर कार्टून पाहण्याचा छंद होता. त्याचा वेळ कार्टून पाहण्यात जात होता. त्याच्या मोठ्या बहीण असलेल्या वैशाली यांनाही कार्टून पाहण्याचा छंद होता. त्यामुळे त्यांच्या आई वडिलांनी मुलांचा कार्टून पाहण्याचा छंद सुटण्यासाठी त्यांना बुद्धीबळ खेळण्याची प्रेरणा दिली. वैशाली यांची सवय सोडण्यासाठी आम्ही बुद्धीबळाकडं त्यांना जोडलं होतं. मात्र, त्यानंतर आमच्या दोन्ही मुलांनी करिअर म्हणून बुद्धीबळ निवडलं. आता दोघंही चांगलं नाव करत असल्याची प्रतिक्रिया रमेशबाबू प्रज्ञानंद यांच्या वडिलांनी दिली.