भुवनेश्वर:महाराष्ट्राच्या वेदांत माधवनने ज्युनियर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ( Junior National Swimming Championships ) अ गटात मुलांच्या 1500 मीटर फ्रीस्टाइल स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम केला. अभिनेता आर माधवनचा मुलगा वेंदातने 16:01.73 सेकंदाची विक्रमी वेळ ( Vedaant Madhavan Creat New Record) नोंदवली. या अगोदर 2017 मध्ये त्याचा सहकारी राज्य भागीदार अद्वैत पेजचा 16:06.43 सेकंदाचा विक्रम मागे टाकला. वेदांतने अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकणाऱ्या कर्नाटकच्या अमोघ आनंद व्यंकटेश (16:21.98 से.) आणि बंगालच्या शुबोजित गुप्ता (16:34.06) यांचा पराभव केला.
Vedaant Madhavan New Record : वेदांत माधवनने 1500 मीटर फ्रीस्टाइलमध्ये मीटचा रचला नवा विक्रम - जलतरणपट्टू वेदांत माधवन
वेदांत माधवनने 48 व्या ज्युनियर नॅशनल एक्वाटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ( 48th Junior National Aquatics Championship ) ही कामगिरी केली. त्याने 2017 मध्ये त्याचाच सहकारी अद्वैत पेजचा 16:01.73 सेकंदाचा वेळ घेत विक्रम मोडला.
कर्नाटकच्या हर्षिका रामचंद्रनने 400 मीटर फ्री स्टाईल गटात दोन मुलींच्या गटात 4:29.25 सेकंदाची वेळ नोंदवून नवा विक्रम प्रस्थापित केला. तिची राज्य सहकारी जलतरणपटू रुजुला एस दुसरी आली. हर्षिकाने 200 मीटरमध्ये 2:23.20 सेकंदांचा वेळ नोंदवत तीन वर्षांपूर्वी अपेक्षा फर्नांडिसने ( Swimmer Apeksha Fernandes ) (2:23.67 सेकंद) केलेल्या मीट विक्रमाला मागे टाकत सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्राच्या अपेक्षी फर्नांडिसने चमक दाखवत 50 मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक जिंकले. एकूण 31 पदकांसह कर्नाटक आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्र (17) आणि तेलंगणा (8) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे.
हेही वाचा -Ind Vs Eng 3rd Odi : इंग्लंडला रिषभ पंत एकटा नडला; भारताचा मालिकेवर कब्जा