नवी दिल्ली : भारतीय बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेन (७५ किलो) ( Lovlina Borgohain Win Gold Medal ) स्वीटी बुरा ( Sweety Bura Won Gold Medal ) आणि परवीन हुडा ( Praveen Hooda Win Gold Medals ) यांनी शुक्रवारी अम्मान, जॉर्डन येथे सुरू असलेल्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक (Parveen (63kg) Won Gold Medal by Defeating Kito Mai ) जिंकले. परवीनने (63 किलो) जपानच्या किटो माईचा 5-0 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. वर्ल्ड चॅम्पियनशिपची ( Asian Boxing Championships in Amman ) कांस्यपदक विजेती परवीन राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होऊ शकली नाही, पण तिने चौथ्या मानांकित माईविरुद्ध येथे वर्चस्व राखले आणि एकमताने विजय मिळवला.
दोन्ही बॉक्सर्सनी केली आक्रमक सुरुवात :दोन्ही बॉक्सर्सनी आक्रमक सुरुवात केली. पण, अव्वल मानांकित परवीनने लवकरच वर्चस्व गाजवले आणि प्रतिस्पर्ध्याला अनेक पंच मारले. पहिल्या फेरीत पराभव झाल्यानंतर माईने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण, परवीन पूर्णपणे तयार होती आणि तिने तिला कोणतीही संधी दिली नाही. भारतीय बॉक्सरने तिसऱ्या फेरीत आपल्या अप्पर कटचा चांगला नमुना सादर केला.