नवी दिल्ली -गेल्या वर्षीची टाटा स्टील कोलकाता 25केची विजेती आणि लांब पल्ल्याची धावपटू किरणजीत कौरवर चार वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. डोपिंग प्रकरणी वर्ल्ड अॅथलेटिक्स डोपिंग एजन्सीने (वाडा) ही बंदी घातली आहे.
भारतीय धावपटू किरणजीत कौरवर चार वर्षाची बंदी - long distance runner latest ban
नॅशनल डोप इन्व्हेस्टिगेशन लॅबोरेटरीला वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीने निलंबित केले आहे. या कारणास्तव कौरचे नमुने दोहा येथील वाडाच्या अधिकृत प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. टाटा स्टील कोलकाता 25केचा पुरस्कारही कौरकडून काढून घेतला जाईल.
![भारतीय धावपटू किरणजीत कौरवर चार वर्षाची बंदी long distance runner kiranjeet kaur has been handed a four-year ban](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7402280-thumbnail-3x2-kaur.jpg)
नॅशनल डोप इन्व्हेस्टिगेशन लॅबोरेटरीला वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीने निलंबित केले आहे. या कारणास्तव कौरचे नमुने दोहा येथील वाडाच्या अधिकृत प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. टाटा स्टील कोलकाता 25केचा पुरस्कारही कौरकडून काढून घेतला जाईल.
32 वर्षीय कौरवर बंदीचा कालावधी 15 डिसेंबरपासून सुरू झाला आहे. 26 फेब्रुवारी रोजी विश्व अॅथलेटिक्सने तिला तात्पुरते निलंबित केले. गेल्या वर्षी मार्चमध्ये पटियाला येथे झालेल्या फेडरेशन कप राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेत 10,000 मीटरमध्ये कांस्यपदक जिंकले होते. 2018 मध्ये गुवाहाटी येथे झालेल्या राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्येही तिने 5000 मीटरमध्ये रौप्यपदक जिंकले. कौरने या बंदीबाबत प्रतिक्रिया दिली. टायफाइड झाला असल्याने गावातील डॉक्टरांनी दिलेली औषधे घेतली होती. त्यामध्ये काय आहे हे ठाऊक नव्हते, असे कौरने सांगितले आहे.