नवी दिल्ली: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी चमकदार सुरु आहे. भारताने आतापर्यंत या स्पर्धेत तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकले आहे. या कामगिरीची दखल घेत पदक मिळवून देणाऱ्या खेळाडूंचे लोकसभेने अभिनंदन केले ( Lok Sabha congratulates Indian medal winners ) आहे. सोमवारी लोकसभेचे कामकाज सुरू होताच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पदक विजेत्यांची नावे घेतली आणि संपूर्ण सभागृहाच्या व त्यांच्या बाजूने त्यांचे अभिनंदन केले.
यासोबतच त्यांनी 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या इतर भारतीय खेळाडूंनाही शुभेच्छा दिल्या. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला ( Lok Sabha Speaker Om Birla ) यांनी मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा आणि अचिंता शिउली यांचे भारतासाठी सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले.