ढाका : मांडीच्या दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर पडल्यानंतर बांगलादेशचा वनडे कर्णधार तमीम इक्बाल ( Bangladesh ODI Captain Tamim Iqbal ) आता कसोटी मालिकेसाठी ( Upcoming ODI series India vs Bangladesh ) साशंक आहे. दोन्ही देशांमधील पहिली कसोटी 14 डिसेंबरपासून चितगाव येथे सुरू होणार आहे. बुधवारी सराव सामन्यादरम्यान तमिमला ही दुखापत झाली. यांसह यष्टिरक्षक लिटन कुमार दासची ( Liton Kumar Das has been Selected for Captaincy ) कर्णधारपदासाठी निवड करण्यात आली आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने दिली माहिती :याबाबत माहिती देताना बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) सांगितले की, तमिमच्या जागी यष्टिरक्षक लिटन कुमार दासची कर्णधारपदासाठी निवड करण्यात आली आहे. 28 वर्षीय लिटनने 2015 मध्ये भारताविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. लिटनने आतापर्यंत 57 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1835 धावा केल्या आहेत. तो प्रथमच एकदिवसीय मालिकेत बांगलादेशचे नेतृत्व करणार आहे. ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये तो बांगलादेशचा १५वा कर्णधार ठरणार आहे.