इटली - मर्सिडीज चालक लुईस हॅमिल्टनने शनिवारी टस्कन ग्रँड प्रिक्स येथे पोल पोझिशन मिळवली. त्याच वेळी, हॅमिल्टनचा संघसहकारी वाल्टेरी बोटासने दुसरे स्थान पटकावले. पहिल्या क्वार्टरमध्ये बोटासने आघाडी घेतली. तर, तिसऱ्या क्वार्टरमध्ये हॅमिल्टन आघाडीवर होता. रेनॉल्टच्या इस्टेबन ओकनशी धडक बसल्यामुळे बोटास पिछाडीवर पडला. हॅमिल्टनने कारकिर्दीतील ९५वी वेळी पोल पोझिशन मिळवली आहे. रेड बुलचा मॅक्स व्हस्टार्पेन तिसऱ्या आणि त्याचा साथीदार अॅलेक्स अल्बॉन चौथ्या स्थानावर राहिला आहे.
फेरारीचा चार्ल्स लेक्लर्कने पहिल्या पाचमध्ये राहिला. ही फेरारीची ऐतिहासिक एक हजारावी शर्यत आहे. त्याचा सहकारी आणि चार वेळाचा चॅम्पियन सेबस्टियन व्हेटेल दुसर्या क्वार्टरमध्ये पुढे जाऊ शकला नाही. तो १४व्या स्थानावर राहिला.