महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

जगज्जेता लुईस हॅमिल्टन 'या' कारणामुळे चिंताग्रस्त

हॅमिल्टन म्हणाला, "जेव्हा मी उठतो आणि चिंताग्रस्त होतो, असे दिवस माझ्याकडे आहेत. मला काम करण्याची प्रेरणा मिळत नाही. आपण कुठे जात आहोत? पुढे काय होईल? मी रेसिंग चालू ठेवू का?". कोरोनाामुळे यंदा फॉर्म्युला वनच्या ऑस्ट्रेलिया आणि मोनॅको शर्यती आधीच रद्द करण्यात आल्या आहेत.

By

Published : May 26, 2020, 8:26 AM IST

lewis hamilton concerned over future of f1 due to Corona
जगज्जेता लुईस हॅमिल्टन 'या' कारणामुळे चिंताग्रस्त

लंडन -सहा वेळचा फॉर्म्युला वन चॅम्पियन लुईस हॅमिल्टनने कोरोनामुळे खेळाच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या व्हायरसच्या उद्रेकामुळे फॉर्म्युला वन मार्चपासून पुढे ढकलण्यात आले. एका वृत्तानुसार, हॅमिल्टनच्या टीम मर्सिडीजने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये हॅमिल्टनने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हॅमिल्टन म्हणाला, "जेव्हा मी उठतो आणि चिंताग्रस्त होतो, असे दिवस माझ्याकडे आहेत. मला काम करण्याची प्रेरणा मिळत नाही. आपण कुठे जात आहोत? पुढे काय होईल? मी रेसिंग चालू ठेवू का?"

तो पुढे म्हणाला, "मला वाटते की या सर्व भिन्न गोष्टी आहेत. पुढचा तास, किंवा जे काही आहे, ते निघून जात आहे. मी जे करतो ते मला आवडते. मी हे सुरू ठेवण्याचा विचार का करू?"

कोरोनाामुळे यंदा फॉर्म्युला वनच्या ऑस्ट्रेलिया आणि मोनॅको शर्यती आधीच रद्द करण्यात आल्या आहेत. तर बहारिन, चीन, व्हिएतनाम, नेदरलँड्स, स्पेन, अझरबैजान आणि कॅनडा ग्रँड प्रिक्स रेस पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details