मुंबई -आठ वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या लिएंडर पेस आणि मॉडेल रिया पिल्लेमध्ये खटका उडाला आणि रियाने पेसच्या विरोधात सन 2014 मध्ये कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पेसने वारंवार शाब्दिक, शारीरिक, मानसिक, आर्थिक छळ करून प्रचंड त्रास दिला असल्याची तक्रार रियाने केली होती. त्यावर वांद्रे येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात सुनावणी पार पडली.
रियाला दर महिना 1 लाख पोटगी देण्याचे कोर्टाचे निर्देश; टेनिसपटू लिएंडर पेसला वांद्रे कोर्टाचा दणका - leander paes case
टेनिसपटू लिएंडर पेसने मॉडेल रिया पिल्लेचा कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत छळ केला असल्याचा ठपका ठेवत वांद्रे येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने रियाला दरमहा 1 लाख रुपये पोटगी देण्याचे निर्देश टेनिसपटू लिएंडर पेसला दिले आहे.
टेनिसपटू लिएंडर पेसने मॉडेल रिया पिल्लेचा कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत छळ केला असल्याचा ठपका ठेवत वांद्रे येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने रियाला दरमहा 1 लाख रुपये पोटगी देण्याचे निर्देश टेनिसपटू लिएंडर पेसला दिले आहे. रियाच्या पहिल्या लग्नाच्या सद्यस्थितीबाबत मला माहिती नव्हती, असा दावा पेसच्या वतीने करण्यात आला. मात्र त्याचे खंडन रियाकडून करण्यात आले. अभिनेता संजय दत्तसोबत रियाचा पहिला विवाह झाला होता. पुढे त्यांनी घटस्फोटाचा दावा दाखल केला. पेसने मुलीचा ताबा मिळावा म्हणून वांद्रे न्यायालयात दावा दाखल केला. त्यांना एक मुलगी असून दोघींसाठी एक लाख रुपये महिन्याला पोटगी देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.
मॉडेल रिया पिल्लेने 2014 मध्ये लिएंडर पेसविरोधात कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्या वेळी ते आठ वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. मात्र त्यादरम्यान पेसने अनेक वेळा शाब्दिक, शारीरिक, मानसिक, आर्थिक छळ केला आणि प्रचंड त्रास दिल्याची तक्रार रियाने केली होती. रियाने केलेल्या तक्रारीमध्ये तथ्य असून लिएंडरने रियाचा छळ केल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. महानगर दंडाधिकारी कोमलसिंह राजपूत यांनी काही दिवसांपूर्वी रियाच्या तक्रारीवर निकाल दिला. नुकतेच संबंधित निकालपत्र उपलब्ध झाले. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पेसने रियाला घरभाडे म्हणून पन्नास हजार रुपये द्यावेत. रियाने पेसच्या घरात एकत्र राहण्याचा निर्णय घेतल्यास ही रक्कम तिला मिळणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.