सनचेऑन (दक्षिण कोरिया): जागतिक चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन ( Bronze medalist Lakshya Sen ) आणि मालविका बनसोड यांनी मंगळवारी कोरिया ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेच्या ( Korea Open Super 500 ) अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. सेनने 14-21, 21-16, 21-18 ने स्थानिक खेळाडू चोई जी हूनचे कडवे आव्हान मोडून काढले. दुसरीकडे मालविका बनसोडने चीनच्या हान युईचा 20-22, 22-20, 21-18 असा पराभव केला.
जर्मन ओपन आणि ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप फायनलमधील ( All England Championship Final ) सहाव्या मानांकित सेनची पुढील फेरीत इंडोनेशियाच्या शेसार हिरेन रुस्ताविटोशी लढत होईल. जानेवारीमध्ये सय्यद मोदी सुपर 300 स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या बिगरमानांकित बन्सोडचा पुढील सामना थायलंडच्या सहाव्या मानांकित पोर्नपावी चोचुवाँगशी होणार आहे. मात्र स्विस ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या एचएस प्रणॉयला मलेशियाच्या चीम जून वेईकडून 41 मिनिटांत 17-21, 7-21 असा पराभव पत्करावा ( Defeat of HS Pranoy ) लागला.
दुहेरीच्या सामन्यात कृष्णा प्रसाद गर्गा आणि विष्णुवर्धन गौड पंजाला या पुरुष जोडीला, इंडोनेशियाच्या प्रमुद्या कुसुमवर्धन ( Indonesian Pramudya Kusumvardhan ) आणि येरेमिया एरिच योचे याकुब रामबितान यांच्याकडून 14-21, 19-21 असा पराभव पत्करावा लागला. बोक्का नवनीथ आणि बी सुमीथ रेड्डी यांना ओंग यू सिन आणि तेओ ई यी या सहाव्या मानांकित मलेशियाच्या जोडीकडून 14-21, 12-21 असा पराभव पत्करावा लागला.