महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

FIFA World Cup 2022 : फ्रांसचा किलियन एमबाप्पे 5 गोलसह गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडीवर - गोल्डन बूट अवॉर्ड

विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला गोल्डन बूट पुरस्कार (Golden Boot Award). दिला जातो. 2018 मध्ये इंग्लंडच्या हॅरी केनला हा पुरस्कार मिळाला होता. त्याने त्या स्पर्धेत सहा गोल केले होते. (FIFA World Cup Golden Boot).

Kylian Mbappe
Kylian Mbappe

By

Published : Dec 5, 2022, 4:04 PM IST

दोहा :कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेच्या (FIFA World Cup 2022) बाद फेरीचे सामने सुरू झाले आहेत. 32 पैकी 16 संघ बाद फेरीत पोहोचले असून जो संघ या फेरीत विजयी होईल तो अंतिम आठमध्ये पोहोचेल. विश्वचषकात फ्रान्सचा स्टार स्ट्राईकर किलियन एमबाप्पे (Kylian Mbappe) 5 गोलसह गोल्डन बूटच्या शर्यतीत (Golden Boot) आघाडीवर आहे. त्याचबरोबर इतर पाच खेळाडूंनी आतापर्यंत 3-3 गोल केले आहेत.

गोल्डन बूट अवॉर्ड म्हणजे काय? :विश्वचषकस्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला गोल्डन बूट पुरस्कार दिला जातो. अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीने हा पुरस्कार सहा वेळा जिंकला आहे. मेस्सीने या विश्वचषकात आतापर्यंत तीन गोल केले आहेत. 2018 मध्ये इंग्लंडच्या हॅरी केनला हा पुरस्कार मिळाला होता. त्याने त्या स्पर्धेत सहा गोल केले होते.

या विश्वचषकात तीन गोल करणारे खेळाडू :

मार्कस रॅशफोर्ड इंग्लंड
लिओनेल मेस्सी अर्जेंटिना
कोडी गप्पो नेदरलॅंड
इनेर वलेन्सीया इक्वेडोर
अल्वारो मोराता स्पेन

या विश्वचषकात दोन गोल करणारे खेळाडू :

ऑलिव्हियर जिरूड फ्रांस
फेरान टोरेस स्पेन
बुकायो साका इंग्लंड
मेहदी तारेमी इराण
आंद्रेज क्रॅमरिक क्रोएशिया
रिचार्लिसन ब्राझील
चो ग्यु-संग दक्षिण कोरिया
मोहम्मद कुदुस घाना
रित्सू डॉन जपान
ब्रुनो फर्नांडीझ पोर्तुगाल
निकलस फुलक्रग जर्मनी
काई हॅव्हर्ट्ज जर्मनी
अलेक्झांडर मिट्रोविच सर्बिया
ब्रील एम्बोलो स्वित्झर्लंड
जियोर्जिओन डी अरासकाएटा उरुग्वे
व्हिन्सेंट अबुबकर कॅमेरून

ABOUT THE AUTHOR

...view details