नवी दिल्ली: तसे पाहिले तर फुटबॉल विश्वचषक 1930 मध्येच सुरू झाला होता. परंतु या खेळाला पहिला शुभंकर (FIFA Mascots) 1966 मध्ये इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विश्वचषकात मिळाला. विविध शुभंकर हे फिफा विश्वचषकाचे फार पूर्वीपासूनचे महत्त्वाचा भाग आहेत. विशेषतः तरुण आणि मुलांमध्ये हे खूप लोकप्रिय आहेत. शुभंकर केवळ विश्वचषकाला प्रोत्साहनच देत नाही तर लोकांच्या मनोरंजनाचे केंद्रही बनले आहे. प्रत्येक विश्वचषकासाठी तज्ज्ञांकडून विविध शुभंकर निवडले जातात आणि त्यानंतर चाहत्यांच्या मतदानाने त्यातील एकाची निवड केली जाते. शुभंकरची सुरुवात झाल्यापासून विश्वचषकाच्या इतिहासात आत्तापर्यंत 15 शुभंकर झाले आहेत. चला तर मग बघूया शुभंकर कधी आणि कसे सादर झाले..(history of FIFA Mascots). (FIFA World Cup 2022).
1) 1966 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या फिफा विश्वचषकापासून शुभंकरची सुरुवात झाली तेव्हा 'विली' नावाचा पहिला शुभंकर लोकांसमोर आला. तो एक सिंह होता. युनियन जॅकची थीम असलेला टी-शर्ट घालण्यासाठी तो बनवण्यात आला होता. फ्रीलान्स आर्टिस्ट रेग हॉय विली याने त्याची रचना केल्याचे सांगितले जाते. विश्वचषकाच्या इतिहासात हा एक माईलस्टोन आहे. यानंतर आगामी स्पर्धांमध्ये देखील शुभंकरांची निवड करण्यात आली आणि शुभंकरांना स्पर्धेचा अविभाज्य भाग बनवण्यात आले.
2) यानंतर 1970 मध्ये मेक्सिकोमध्ये फुटबॉलचा विश्वचषक झाला तेव्हा यजमान देशाच्या रंगात रंगवलेला एक मेक्सिकन मुलगा 'जुआनिटो' शुभंकर म्हणून आला होता. तो त्याच्या स्टायलिश लूक मुळे खूप लोकप्रिय झाला होता.
3) त्यानंतर पुढील फिफा विश्वचषक 1974 मध्ये पश्चिम जर्मनीमध्ये आयोजित करण्यात आला होता. या फिफा विश्वचषकात 'टिप आणि टॅप' या दोन मुलांचा शुभंकर म्हणून स्वीकार करण्यात आला.
4) अर्जेंटिना येथे झालेल्या 1978 च्या विश्वचषकासाठी एका तरुण कुशल रायडरची शुभंकर म्हणून निवड करण्यात आली. त्याचे नाव 'गौचितो' असे ठेवण्यात आले. 'गचितो' कडे पिवळा रुमाल आणि चाबूक होता, जो दक्षिण अमेरिकन देशांतील कुशल घोडेस्वारांचे प्रतीक आहे.
5) 1982 च्या फिफा विश्वचषकाच्या वेळी स्पेनने परंपरेत थोडा बदल करून शुभंकर म्हणून एक फळ सादर केले. जगाला 'नारंजितो' नावाचा शुभंकर स्पॅनिश जर्सीत हसताना दिसला.
6) 1986 मध्ये मेक्सिकोमध्ये आयोजित विश्वचषक स्पर्धेत भाजीपालाच्या शेतात शुभंकर सादर केल्या गेला. मेक्सिकोने त्याला 'पीक' असे नाव दिले. ही मेक्सिकोची प्रसिद्ध मिरची आहे, जी मेक्सिकन फूडमध्ये भरपूर वापरली जाते. त्याची टोपी खूप लोकप्रिय झाली होती.
7) 1990 मध्ये इटलीमध्ये फिफा विश्वचषक स्पर्धा पार पडली. यादरम्यान एक अनोखा शुभंकर तयार करण्यात आला आणि त्याला 'सियाओ' असे नाव देण्यात आले. त्याचे शरीर इटालियन रंगांच्या चौकोनी ब्लॉक्सपासून बनवले गेले होते, ज्याला लवचिक स्टिक रक फुटबॉलचा आधार होता. त्याला स्टिक प्लेअरचे स्वरूप देण्यात आले.