हैदराबाद: खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2021 सध्या बेंगळुरूमध्ये सुरू आहेत. आज म्हणजेच 28 एप्रिल रोजी आस्था पाहवा ( Boxer Aastha Pahwa ) हिने मुलींच्या बॉक्सिंगच्या 63-66 लाइट वेल्टरवेट प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. चौधरी चरणसिंग युनिव्हर्सिटीकडून खेळणाऱ्या आस्थाने अंतिम फेरीत सिव्हीचा पराभव केला.
आस्था ही उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर ( Union Sports Minister Anurag Thakur ) देखील आस्थाच्या विजयाने खूप प्रभावित झाले आहेत. त्यांनी ट्विट केले की, “कष्टाचे फळ नेहमीच मिळते. आस्थाने 63-66 किलो वेल्टरवेट प्रकारात सुवर्णपदक जिंकले.
28 एप्रिल रोजी झालेल्या इतर बॉक्सिंग सामन्यांबद्दल सांगायचे तर, सासन गिल आणि दीपक आपापल्या वजनीगटात सुवर्णपदक जिंकण्यात यशस्वी ठरले. सध्या, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2021 ( Khelo India University Games 2021 ) मध्ये यजमान जैन विद्यापीठ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. जैन विद्यापीठाने आतापर्यंत 13 सुवर्णांसह 20 पदके जिंकली आहेत. यानंतर पंजाब विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा क्रमांक लागतो.