नवी दिल्ली -केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी फिट इंडिया डायलॉगच्या दुसऱ्या सत्राचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी फिटनेस आणि क्रीडा 'आयकन्स'शी संवाद साधला. चर्चेचे नेतृत्व माजी धावपटू मिल्खा सिंग यांनी केले.
हेही वाचा -VIDEO : 'हाता खुजा रे थे क्या'; मोहम्मद सिराजची खास हैद्राबादी ढंगात मुलाखत
या चर्चेत बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर, भारतीय महिला क्रिकेटर मिताली राज, भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भूतिया यांच्यासह भारतीय बॅडमिंटन संघाचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनीही भाग घेतला.
चर्चेदरम्यान, या सर्वांनी आपला फिटनेस मंत्र सांगितला आणि अलीकडच्या काळात फिटनेसबाबत लोकांचा दृष्टिकोन कसा बदलला याविषयीही त्यांनी मत मांडले. कोणत्याही वयात तंदुरुस्त कसे राहावे आणि कोणता व्यायाम करावा, याबद्दलही चर्चा करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबरमध्ये पहिला फिट इंडिया डायलॉग आयोजित केला होता. यात भारतीय कर्णधार विराट कोहली, फिटनेस आयकन मिलिंद सोमण आणि अनेक दिग्गज व्यक्तींनी भाग घेतला होता.