भोपाळ ( मध्य प्रदेश ) : मध्य प्रदेशमध्ये खेलो इंडिया युथ गेम्सचे आयोजन करण्यात येत आहे.अशा परिस्थितीत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत. तरण पुष्कर येथे सुरू असलेल्या जलतरण स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देण्यासाठी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आले होते. मुलांना जास्तीत जास्त पदके मिळवून राज्य आणि देशाचे नाव उंचावण्यास सांगितले. यावेळी क्रीडा मंत्री यशोधरा राजेही उपस्थित होत्या.
विविध राज्यातून खेळाडू आले :मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते खेळाडूंना पुरस्कार आणि विजयीपत्र देण्यात आले. जलतरणात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करत अनेक सुवर्णपदके पटकावली. दुसरीकडे, बुधवारी संध्याकाळी टीटी नगर स्टेडियमवर पोहोचलेल्या मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हस्तांदोलन करून उपस्थित खेळाडूंचे अभिवादन स्वीकारले. खेलो इंडिया युथ गेम्समध्ये दिल्ली, कर्नाटक, राजस्थान, उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, ओरिसा, महाराष्ट्र या राज्यातून खेळाडू आले होते.
हरियाणा दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला :मध्य प्रदेशमध्ये ११ फेब्रुवारीपर्यंत सुरू असलेल्या खेलो इंडियामध्ये भाग घेण्यासाठी देशभरातून १८ वर्षांखालील तरुणांचा मोठा सहभाग पहायला मिळाला आहे. या स्पर्धेत मध्य प्रदेशातील शहरांमध्ये 6000 हून अधिक खेळाडू आपले कौशल्य दाखवत आहेत. खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी वर्चस्व कायम राखले आहे. महाराष्ट्राचे खेळाडू सर्वाधिक 37 सुवर्ण पदकांसह पहिल्या स्थानावर आहेत. यासह त्यांच्या खात्यात 35 रौप्य आणि 31 कांस्य अशी एकूण 101 पदके जमा झाली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर हरियाणा आहे, ज्याने 25 सुवर्ण, 20 रौप्य, 18 कांस्यांसह 63 पदकांचा समावेश केला आहे.
मध्य प्रदेश तिसऱ्या स्थानावर :मध्य प्रदेशचे खेळाडूही 25 सुवर्ण पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय मध्य प्रदेशला 13 रौप्य आणि 23 कांस्यांसह एकूण 61 पदके मिळाली आहेत. रौप्य पदकांसह इतर पदकांच्या कमी संख्येमुळे एमपीचा संघ तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. राजस्थानचे खेळाडू चौथ्या स्थानावर आहेत. त्यांनी आतापर्यंत 14 सुवर्णपदके जिंकली आहेत. तर पाचव्या स्थानावर 10 सुवर्णपदकांसह ओरिसा संघ आहे. त्याचबरोबर पश्चिम बंगालचा संघ सहाव्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत 9 सुवर्ण मिळवले आहेत. तर तामिळनाडूचा संघ 8 सुवर्ण पदकांसह सातव्या स्थानावर आहे. उत्तर प्रदेशचा संघ आठव्या क्रमांकावर आहे. त्याच्या खात्यात 6 सुवर्णपदके जमा झाली आहेत. दिल्ली 6 सुवर्णांसह नवव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, कर्नाटक संघ 5 सुवर्णांसह 10 व्या स्थानावर कायम आहे. पंजाब आणि तेलंगणा 11 व्या स्थानावर आहेत.
हेही वाचा :Khelo India Youth Games 2023: खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राचे वर्चस्व; मध्य प्रदेश संघ 25 सुवर्ण पदकांसह दुसऱ्या स्थानावर