नवी दिल्ली - हरयाणाच्या पंचकुला येथे होणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम्स-२०२१ मध्ये गटका, कलारिपयट्टू, थांगा-ता आणि मल्लखांब या चार देशी खेळांना समाविष्ट करण्यास क्रीडा मंत्रालयाने मान्यता दिली आहे.
"देशी खेळांचा भारतातील समृद्ध वारसा आहे. या खेळांचे जतन, प्रसार करणे ही क्रीडा मंत्रालयाची प्राथमिकता आहे. खेलो इंडिया गेम्स यापेक्षा आणखी कोणतेही व्यासपीठ नाही. या खेळांचे खेळाडू स्पर्धा करू शकतात. योगासनबरोबर खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा २०२१ मध्ये चार देशी खेळांचा समावेश करण्यात आला याबद्दल मला आनंद झाला", असे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू म्हणाले आहेत.