गुवाहाटी - खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे जलतरण क्रीडा प्रकारात आपला दबदबा कायम राखला. जलतरणपटू अपेक्षा फर्नाडिस, केनिशा गुप्ता आणि मिहीर आम्ब्रे यांनी सुवर्णपदक पटकावले. वेटलिफ्टिंगमध्ये साताऱ्याच्या वैष्णवी पवार हिने सुवर्णपदक जिंकले. तर जळगावच्या दिशा पाटीलने १७ वर्षांखालील ६३ किलो मुष्टीयुद्ध क्रीडा प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली.
जलतरण -
- अपेक्षाने १७ वषार्खालील मुलींच्या २०० मीटर्स बटरफ्लाय व ५० मीटर्स ब्रेस्ट स्ट्रोक शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. याच शर्यतीत महाराष्ट्राच्या करिना शांताने रौप्य तर झारा जब्बार हिने कांस्य पदकाची कमाई केली. केनिशाने १७ वर्षाखालील गटात ५० मीटर्स फ्री स्टाईलमध्ये विजेतेपद पटकाविले.
- मुलांच्या २१ वर्षांखालील गटात मिहिरने ५० मीटर्स फ्री स्टाईल शर्यत जिंकली. रुद्राक्ष मिश्राने कांस्य पदक मिळवले. महाराष्ट्राने २१ वषार्खालील गटात ४ बाय १०० मीटर्स फ्री स्टाईल रिले स्पर्धा जिंकली. या संघात रुद्राक्ष, मिहिर, सुचित पाटील व एरॉन फर्नांडिस यांचा समावेश आहे.
वेटलिफ्टिंग -
- ८१ किलो वजनी गटात वैष्णवीने १३४ किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. तिने स्नॅचमध्ये ६२ तर क्लिन आणि जर्क प्रकारात ७२ किलो वजन उचलले.