वेलिंगटन : वेलिंग्टन : न्यूझीलंडला पहिले जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकून ( One of The Most Successful Test Captains ) देणारा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार केन विल्यमसनने कसोटी कर्णधारपद ( New Zealand's first World Test Championship ) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने गुरुवारी याची घोषणा केली. वेगवान गोलंदाज टीम साऊदीला नवा कसोटी कर्णधार ( Fast Bowler Team Saudila has been Made Nw Test Captain ) बनवण्यात आले आहे.
माजी कर्णधार विल्यमसन याने व्यक्त केले मनोगत : विल्यमसन म्हणाला, न्यूझीलंड कसोटी संघाचे नेतृत्व करणे ही विशेष अभिमानाची बाब होती. माझ्यासाठी कसोटी क्रिकेट सर्वोपरी आहे. मी त्यातील आव्हानांचा पुरेपूर आनंद घेतला. गेल्या सहा वर्षांत विल्यमसनने त्याच्या नेतृत्वाखाली 40 कसोटींमध्ये विक्रमी 22 जिंकले आहेत, दहा गमावले आहेत आणि आठ अनिर्णित राहिले आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने गेल्या वर्षी भारताचा पराभव करून पहिले जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकले होते.
केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाची उत्तम कामगिरी :केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील विजयाची टक्केवारी 55 होती. त्या तुलनेत स्टँडइन कर्णधार टॉम लॅथमच्या नेतृत्वाखाली 44 टक्के आणि माजी कर्णधार आणि सध्याचे इंग्लंडचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांच्या नेतृत्वाखाली 35.5 टक्के अशी होती. विल्यमसन याने सांगितले की, कर्णधारपदामुळे मैदानावर आणि मैदानाबाहेर अतिरिक्त कामाचा ताण येतो. माझ्या करिअरच्या या टप्प्यावर हा योग्य निर्णय आहे, असे मला वाटते. न्यूझीलंड क्रिकेटशी बोलल्यानंतर आमच्या लक्षात आले की, पुढील दोन वर्षांत दोन विश्वचषक स्पर्धा होणार आहेत आणि अशा परिस्थितीत मर्यादित षटकांच्या कर्णधारपदावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी विल्यमसनच्या कारकिर्दीचा केला गौरव :सौदी हा न्यूझीलंडचा 31 वा कसोटी कर्णधार असेल. त्याच्या नेतृत्वाखाली संघ या महिन्यात पाकिस्तानविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. त्याने 22 टी-20 सामन्यांमध्ये न्यूझीलंडचे नेतृत्व केले आहे. मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी विल्यमसनच्या कर्णधार म्हणून दिलेल्या योगदानाचे कौतुक करताना सांगितले की, केनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने खूप यश मिळवले. त्याने आपल्या कामगिरीद्वारे आघाडीचे नेतृत्व केले आणि संघाला त्याच्या पहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये विजय मिळवून दिला.
नवा कर्णधार सौदी याने व्यक्त केले मनोगत :त्याने सांगितले की, आम्हांला आशा आहे की त्याच्यावरील कामाचा ताण कमी करून आम्ही त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर दीर्घकाळ खेळताना पाहू शकू. नवा कर्णधार सौदी म्हणाला, कसोटी कर्णधार होणे ही अभिमानाची बाब आहे. कसोटी क्रिकेट हे सर्वात मोठे आव्हान आहे आणि या फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून मी रोमांचित आहे. मला आशा आहे की केनचे कार्य पुढे नेण्यात सक्षम होईल.