बंगळुरू - कंबालामध्ये (चिखलगुट्टा पद्धतीच्या पारंपरिक बैलगाडी शर्यत) विक्रम नोंदवल्यानंतर चर्चेत आलेला श्रीनिवास गौडा लवकरच भारताची जर्सी घालून मैदानात धावणार आहे. श्रीनिवास गौडाला भारतीय क्रीडा प्राधिकरणा(साई)च्यावतीने बंगळुरू येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
मुदाबिदरी येथे झालेल्या कंबाला शर्यतीत श्रीनिवास रेड्यांना घेवून पाण्यातून १४२.५ मीटर अंतर केवळ १३.६२ सेकंदात पार केले होतो. याचा अर्थ गौडाने १०० मीटर अंतर फक्त ९.५५ सेकंदात पार केले. त्यानंतर त्याला भारताचा उसेन बोल्ट म्हणून ओळखले जात आहे. याबाबत माहिती मिळताच सर्वप्रथम देशाचे क्रीडा मंत्री किरेन रिजूजू यांनी त्याला साईमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यानंतर साईच्या दक्षिण विभागाचे प्रमुख अजय कुमार बहल यांनीही त्याला बंगळुरूच्या प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण देण्याची इच्छा व्यक्त केली होती.