महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Women's World Boxing Championship: चीनच्या वांग लीनाचा पराभव करत भारताच्या स्वीटीने जिंकले सुवर्णपदक - भारताच्या स्वीटी बुराने बॉक्सिंग चॅम्पियनशिप

भारताच्या स्वीटी बुरा हिने महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात सुवर्णपदक जिंकले आहे. चीनच्या वांग लीनाचा ३-२ असा पराभव करून स्वीटी विश्वविजेती ठरली आहे.

Women's World Boxing Championship
Sweety Boora

By

Published : Mar 25, 2023, 9:56 PM IST

नवी दिल्ली : नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी क्रीडा संकुलात आज शनिवार (दि. 25 मार्च) झालेल्या महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताची अनुभवी बॉक्सर स्वीटी बुरा हिने चीनच्या वांग लीनाचा ३-२ असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. या सामन्यात बुराने पहिल्या फेरीपासूनच वांग लीनावर वर्चस्व गाजवले आणि ती सुरुवातीपासूनच आक्रमक दिसत होती.

वांग लीनाचा 3-2 असा पराभव : भारताची दिग्गज बॉक्सर स्वीटी बुरा 2014 मध्ये महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकण्याच्या जवळ आली होती. परंतु, ती जिंकू शकली नाही. हरियाणाच्या या बॉक्सरने महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात 4-3 असा विजय मिळवला होता. आणि आता स्वीटी बुरा 81 किलो गटात वर्ल्ड चॅम्पियन बनली आहे. स्वीटी बुराने 2018 ची चॅम्पियन आणि 2019 कांस्यपदक विजेती चीनच्या वांग लीनाचा 3-2 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.

स्वीटी बुराने कझाकिस्तानच्या बॉक्सरचा 5-0 असा पराभव : स्वीटी बुरा ही हरियाणा राज्यातील हिसार जिल्ह्यातील आहे. 10 जानेवारी 1993 रोजी शेतकरी कुटुंबात जन्मलेली स्वीटी बुरा ही राज्यस्तरीय कबड्डीपटू आहे. 2009 मध्ये, वडिलांचे ऐकल्यानंतर, स्वीटीने बॉक्सिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. स्वीटी बुराचे वडील राष्ट्रीय स्तरावरील बास्केटबॉल खेळाडू आहेत. स्वीटीने हरियाणामध्येच बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेतले आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये जॉर्डन येथे झालेल्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये 81 किलो वजनी गटात खेळताना स्वीटी बुराने कझाकिस्तानच्या बॉक्सरचा 5-0 असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले.

अंतिम सामना रविवारी : भारतीय बॉक्सिंगसाठी शनिवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. भारताची पहिली युवा बॉक्सर नीतू घनघास हिने ४८ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात मंगोलियाच्या लुत्सेखान अटलांसेटसेगचा ५-० असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर भारताची अनुभवी बॉक्सर स्वीटी बुराने चीनच्या वांग लीनाचा पराभव करत सुवर्णपदकावर कब्जा केला. निखत झरीन आणि लोव्हलिना बोरगोहेन या दोन अन्य भारतीय बॉक्सरचा अंतिम सामना रविवारी होणार आहे. भारतातील १२५ कोटी जनतेला या दोघांकडून सुवर्णपदक जिंकण्याची आशा आहे. आता हे दोन स्टार बॉक्सर सुवर्णपदक जिंकण्यात यशस्वी होतात की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हेही वाचा :Amritpal Singh: अमृतपालच्या जवळच्या महिलेला NIA ने दिल्लीत नेले का? जाणून घ्या उत्तराखंड पोलिसांचे उत्तर

ABOUT THE AUTHOR

...view details