नवी दिल्ली: ज्योती याराजीने ( Jyoti Yaraji ) नेदरलँड्समधील वूट येथे सुरू असलेल्या डी हरी शल्टिंग गेम्स 2022 मध्ये दोन आठवड्यांत तिसऱ्यांदा महिलांच्या 100 मीटर अडथळा शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम मोडला ( National Record Third Time Break ) आहे. 22 वर्षीय ज्योतीने रविवारी ब्रिटनमधील लॉफबोरो आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स मीटमध्ये सुवर्णपदक जिंकून आपला स्वतःचा 13.11 सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम सुधारण्यासाठी हीटमध्ये 13.04 सेकंद नोंदवले.
इतर निकालांमध्ये, राष्ट्रीय विक्रम धारक सिद्धांत थिंगल्यने पुरुषांच्या 110 मीटर अडथळा शर्यतीत 14.42 सेकंद वेळेसह तिसरे स्थान पटकावले.