महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 2, 2022, 6:57 AM IST

ETV Bharat / sports

Commonwealth Games 2022 : जुडोत सुशिला देवीला रौप्य तर विजय कुमारला कांस्य पदक; भारताच्या खात्यात एकूण 8 पदक

कॉमनवेल्थ गेम्स ( Commonwealth Games 2022 ) मध्ये जुडोत सुशीला देवी हिने ( Sushila Devi won silver medal ) रौप्य तर विजय यादव याने कांस्य पदक ( Vijay Yadav won bronze in common wealth games ) जिंकले आहे. त्यांच्या पदकांसह बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदकांची संख्या आठवर पोहचली आहे. भारताने आतापर्यंत तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि दोन कांस्यपदक जिंकले आहेत.

Commonwealth Games 2022 Day 4
सुशीला देवी रौप्य पदक कॉमनवेल्थ गेम्स

बर्मिंघम -कॉमनवेल्थ गेम्स ( Commonwealth Games 2022 ) मध्ये जुडोत सुशीला देवी हिने ( Sushila Devi won silver medal ) रौप्य तर विजय यादव याने कांस्य पदक ( Vijay Yadav won bronze in common wealth games ) जिंकले आहे. त्यांच्या पदकांसह बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदकांची संख्या आठवर पोहचली आहे. भारताने आतापर्यंत तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि दोन कांस्यपदक जिंकले आहेत. सुशीलापूर्वी बिंदियाराणी देवी आणि संकेत सरगर यांनी वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकले होते. त्याचवेळी मीराबाई चानू, जेरेमी लालनिरुंगा आणि अचिंता शेउलीने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक पटकावले. वेटलिफ्टिंगमध्ये विजय यादव आणि गुरुराज पुजारी यांनी कांस्यपदक जिंकले.

हेही वाचा -CWG 2022 : वेटलिफ्टिंगमध्ये भारताचे थोडक्यात हुकले सातवे पदक; चौथ्या स्थानी राहिलेला कोण आहे अजय सिंग? घ्या जाणून

मिकेला व्हिबोईने सुशीलाला आर्म लॉक केले -जुडोमध्येसुशीला देवीने 48 किलो वजन गटात रौप्य पदक जिंकले. अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या मिकेला व्हिबोईने सुशीलाला आर्म लॉक केले. यानंतर सुशीला काही वेळ मॅटवरच आर्म लॉक सोडण्याचा प्रयत्न करत होती. अशा स्थितीत रेफ्रीने दक्षिण आफ्रिकेच्या व्हिबोईला विजेता घोषित केले. राष्ट्रकुल स्पर्धेतील सुशीलाचे हे दुसरे रौप्य पदक आहे. यापूर्वी 2014 च्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेतही तिने रौप्यपदक जिंकले होते. सुशीलाने 2019 च्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत 48 किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकले आहे.

जुडोमध्ये भारताला दुसरे पदक -जुडोमध्येच भारताने दुसरे पदक जिंकले आहे. विजय यादवने सायप्रसच्या पेट्रोस क्रिसटोडुलाइड्सचा पराभव केला. विजयने 'इपपोन'ने पेट्रोसचा पराभव केला. जुडोमध्ये स्कोअरिंगचे तीन प्रकार आहेत. इपपोन, वजा-आरी आणि युको. जेव्हा खेळाडू समोरच्या खेळाडूकडे थ्रो करतो आणि त्याला उठू देत नाही तेव्हा इपपोन होतो. इपपोन झाल्यावर एक फूल पॉइंट दिला जातो आणि खेळाडू जिंकतो. विजय याच पद्धतीने जिंकला.

पराभवानंतर जसलीन सैनी कांस्यपदकासाठी खेळणार -जसलीन सिंग सैनीपुरुषांच्या 66 किलो गटात स्कॉटलंडच्या फिनले एलेनकडून पराभूत झाला. तो आता कांस्यपदकासाठी खेळेल. सकाळी सैनी सहज उपांत्य फेरीत पोहचला होता, परंतु अडीच मिनिटांपेक्षाही कमी कालावधीच्या सामन्यात एलनने इपपोन करून पॉइंट जमा केले, त्यामुळे सैनीला पराभवाचा सामना करावा लागला. सैनीला अजूनही पदक जिंकण्याची संधी आहे. तो कांस्यपदकासाठी प्लेऑफमध्ये ऑस्ट्रेलियाच्या नाथन काज याच्याशी खेळेल. सुचिका तरियालने महिलांच्या ५७ किलो वजन गटात दक्षिण आफ्रिकेच्या डोन्ने ब्रेटेनबाशचा पराभव करून कांस्यपदकासाठीच्या सामन्यात प्रवेश मिळवला आहे.

हेही वाचा -CWG 2022: लॉन बॉलमध्ये भारताचा न्यूझीलंडवर विजय; अंतिम फेरीत दाखल झाल्याने पदक निश्चित

ABOUT THE AUTHOR

...view details