महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

जेएसडब्ल्यू कोकण किनारा क्रॉसकंट्री स्पर्धेत जोशात धावले स्पर्धक

आज सकाळी ८ वाजता या स्पर्धेला जयगड येथील कर्‍हाटेश्‍वर मंदिर येथून सुरुवात झाली आणि समारोप जेएसडब्ल्यूच्या सिध्दीविनायक मंदिराजवळ झाला. स्पर्धेच्या नियोजनाबद्दल उपस्थित डॉ. मुंढे यांनी समाधान व्यक्त केले.

jsw kokan kinara cross country championship 2019
जेएसडब्ल्यू कोकण किनारा क्रॉसकंट्री स्पर्धेत जोशात धावले स्पर्धक

By

Published : Dec 5, 2019, 7:06 PM IST

रत्नागिरी- जेएसडब्ल्यू आणि रत्नागिरी जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज (गुरुवार) कोकण किनारा क्रॉसकंट्री जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जवळपास चौदाशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.

क्रॉसकंट्री जिल्हास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन आणि पारितोषक वितरणाला जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, जेएसडब्ल्यूचे व्हाईस प्रेसिडेंट आदित्य अगरवाल, यतिश छाब्रा, विरेंद्र चंदावत, जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनचे संदिप तावडे यांच्यासह कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

जेएसडब्ल्यू कोकण किनारा क्रॉसकंट्री स्पर्धेतील क्षण....

आज सकाळी ८ वाजता या स्पर्धेला जयगड येथील कर्‍हाटेश्‍वर मंदिर येथून सुरुवात झाली आणि समारोप जेएसडब्ल्यूच्या सिध्दीविनायक मंदिराजवळ झाला. स्पर्धेच्या नियोजनाबद्दल उपस्थित डॉ. मुंढे यांनी समाधान व्यक्त केले.

सलग चार वर्षापासून आयोजित करण्यात येत असलेल्या या स्पर्धेत दरवर्षी एक हजारहून अधिक स्पर्धक सहभागी होत असतात. या स्पर्धेच्या माध्यमातून नवीन खेळाडू तयार होत असून ते जिल्हा असोसिएशनच्या स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळताना दिसतात.

क्रॉसकंट्री जिल्हास्तरीय स्पर्धेचा निकाल -

  • १० किलोमीटर खुला गट महिला -
  • प्रमिला पाटील, योगिता तांबडेकर, रिया शिंदे
  • १० किलोमीटर खुला गट पुरुष -
  • रुपेश धनावडे, स्वराज जोशी, करन फणसे.
  • १० किलोमीटर जेएसडब्ल्यू कर्मचारी -
  • प्रणव गोबाडे, सुरज होनागडे, नरेंद्र अगरवाल.
  • १० किलोमीटर खुला गट पुरुष -
  • सागर म्हस्के, सिध्देश भुवड, अविनाश पवार.
  • १७ वर्षांखालील मुली -
  • साक्षी जड्यार, मनाली गावडे, साक्षी पवार.
  • १७ वर्षांखालील मुले -
  • अभिजित जड्यार, नितेश माचिवले, दिनेश डांगे.
  • १४ वर्षांखालील मुली -
  • शिवानी गोरे, सारीका काळे, श्रुती फणसे.
  • १४ वर्षांखालील मुले -
  • संकेत भुवड, ॠतुराज घाणेकर, ओमकार चांदीवडे.

ABOUT THE AUTHOR

...view details