नवी दिल्ली - भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने त्याच्या करियरमधील टर्निंग पाँईंट बद्दल सांगितलं. नीरज म्हणाला की, नॅशनल शिबिरात सहभागी होणे माझ्या करियरमधील सर्वात महत्वाचा टर्निंग पाँईट ठरला. नीरज चोप्रा 7 ऑगस्ट रोजी ऑलिम्पिकच्या अॅथलेटिक्समध्ये सुवर्ण पदक जिंकणारा भारताचा पहिला खेळाडू ठरला. त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटर लांब भाला फेकत ही कामगिरी केली.
भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यात नीरज चोप्रा म्हणाला, 2015-16 च्या नॅशनल स्पर्धेनंतर माझी निवड नॅशनल शिबिरासाठी झाली. हा माझ्या क्रीडा करियरमधील निर्णायक क्षण ठरला. शिबिरात आम्हाला चांगल्या सुविधा मिळाल्या.
मी माझ्या वरिष्ठ अॅथलिटना पाहून प्रेरित झालो होतो. देशाच्या सर्वश्रेष्ठ अॅथलिटमध्ये प्रशिक्षण घेण्याची एक वेगळी भावना होती. मी फक्त कठोर परिश्रम घेतलं आणि परिणाम तुमच्यासमोर असल्याचे देखील नीरज म्हणाला.