महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

जेरेमी लालरिनंगाने नोंदवला राष्ट्रीय विक्रम! - जेरेमी लालरिनंगा लेटेस्ट न्यूज

युवा ऑलिम्पिक चॅम्पियन जेरेमी लालरिनंगाने पुरुषांच्या ६७ किलो गटात क्लीन अँड जर्क मध्ये राष्ट्रीय विक्रमही नोंदवला आहे.

Jeremy Lalrinnunga wins gold medal with national record
जेरेमी लालरिनंगाने नोंदवला राष्ट्रीय विक्रम!

By

Published : Feb 4, 2020, 8:44 AM IST

नवी दिल्ली - ७२ व्या पुरुष आणि ३५ व्या महिला वरिष्ठ भारोत्तोलन स्पर्धेतील पुरुषांच्या ६७ किलो गटात युवा ऑलिम्पिक चॅम्पियन जेरेमी लालरिनंगाने विजेतेपद पटकावले. जेरेमीने क्लीन अँड जर्क मध्ये राष्ट्रीय विक्रमही नोंदवला.

हेही वाचा -जोकोविच अव्वलस्थानी...२१ वर्षीय सोफियाने मिळवले सातवे स्थान

मिझोरामच्या जेरेमीने दोन अयशस्वी प्रयत्नांनंतर १३२ किलो वजन उचलत क्लीन अँड जर्क मध्ये ही कामगिरी केली. गेल्या वर्षी त्याने डिसेंबरमध्ये कतार आंतरराष्ट्रीय चषक स्पर्धेदरम्यान सर्वोत्तम कामगिरी केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details