महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

मूत्र परीक्षणाच्या नमुन्यात फसवणूक, भालाफेकपटूवर ४ वर्षाची बंदी - भालाफेकपटू अमित दहियावर बंदी न्यूज

हरियाणाच्या सोनीपत येथे १६ एप्रिल २०१९ रोजी झालेल्या स्पर्धेत दहियाने तिसरे स्थान पटकावले होते. त्यानंतर, नाडाच्या अधिकाऱ्यांनी २१ वर्षीय दहियाला डोपचे नमुने देण्यास सांगितले होते.

Javelin thrower Amit Dahiya banned for 4 years for evading dope sample collection
लघवीच्या नमुन्यात केली फसवणूक, भालाफेकपटूवर ४ वर्षाची बंदी

By

Published : Feb 19, 2020, 5:12 PM IST

नवी दिल्ली -आपल्या लघवीच्या नमुन्याऐवजी दुसऱ्यास नमुना देण्यासाठी पाठवणारा भालाफेकपटू अमित दहिया अडचणीत आला आहे. नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सीच्या (नाडा) शिस्त समितीने हरियाणाच्या अमितवर चार वर्षांसाठी बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला आहे.

हेही वाचा -दुबई ओपन : सानिया मिर्झा-कॅरोलिन गार्सिया उपांत्यपूर्व फेरीत

हरियाणाच्या सोनीपत येथे १६ एप्रिल २०१९ रोजी झालेल्या स्पर्धेत दहियाने तिसरे स्थान पटकावले होते. त्यानंतर, नाडाच्या अधिकाऱ्यांनी २१ वर्षीय दहियाला डोपचे नमुने देण्यास सांगितले, परंतु त्याऐवजी त्याने दुसर्‍यास नमुना देण्यासाठी पाठवले.

मात्र, पडताळणी प्रक्रियेदरम्यान नाडाच्या डोपचे नमुने गोळा करणार्‍या अधिकाऱ्यांना हा घोटाळा लक्षात आला. आपली योजना अयशस्वी ठरली असल्याचे लक्षात येताच सदर व्यक्ती पळून गेला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details