दोहा (कतार) :युवा खेळाडू फुलरने 81व्या मिनिटाला केलेल्या एकमेव गोलच्या बळावर रविवारी कोस्टा रिकाने जपानला 1-0 ने पराभूत केले. (JAPAN VS COSTA RICA). दोन सामन्यानंतर दोन्ही संघांचे ई गटात तीन गुण आहेत. फुलरने जपानच्या बचावात्मक त्रुटीचा फायदा घेत 18 मीटर अंतरावरून नेटमध्ये शॉट मारला, जो जपानचा गोलरक्षक शुची गोंडा याला अडवता आला नाही. (FIFA World Cup 2022).
हाफ टाईम पर्यंत एकही गोल नाही :हाफ टाईम पर्यंतदोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. कागदावर कमजोर असणाऱ्या कोस्टा रिकाच्या संघाने जपानला कडव टक्कर दिली. चेंडूवर ताबा मिळवण्याच्या बाबतीत कोस्टा रिकाचा संघ जपानपेक्षा सरस ठरला. कोस्टा रिकाचा चेंडूवर ताबा 58 टक्के तर जपानचा 42 टक्के होता.