मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यू करताना, सायंकाळी ५ वाजता घराच्या खिडकीत येऊन लोकांना टाळ्या, ताट, शंख, घंटा वाजवून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्वांचेच आभार मानण्याची विनंती केली होती. मोदींच्या या आवाहनाला भारतीयांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. सेलिब्रेटींपासून ते सामान्य जनतेपर्यंत सर्वांनी सायंकाळी पाच वाजता आपापल्या परीने आभार व्यक्त केले. पण, मोदीजी ५ वाजता तुम्ही कायं केलं?, असा सवाल ऑलिम्पिक पदक विजेता विजेंदर सिंगने केला आहे.
मोदींच्या आवाहनानंतर, देशवाशीयांनी सायंकाळी ५ वाजता कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्सचे आभार मानण्यासाठी टाळ्या, ताट, शंख आणि घंटा वाजवले. सेलिब्रेटींपासून ते सामान्य जनतेनं यात सहभाग नोंदवला. प्रत्येकानीं सायंकाळी पाच वाजता आपापल्या परीने आभार व्यक्त केलं. तसे व्हिडिओही सोशल मीडियावर अपलोड केले. पण, यादरम्यान, मोदीजी तुम्ही काय केलं हे सांगा, असे विजेंदर सिंगन म्हटलं आहे.
विजेंदर सिंगने एक ट्विट केलं आहे. त्यात तो म्हणतो, 'सर नरेंद्र मोदीजी, कृपया आपण आपला व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करा. आम्हाला पण पाहायचे आहे की, तुम्ही पाच वाजता टाळ्या वाजवल्या की आणखी काही...'