नवी दिल्ली: भारताच्या स्वप्नील कुसळेने गुरुवारी पहाटे अझरबैजानच्या बाकू येथे आयएसएसएफ विश्वचषक रायफल/पिस्तूल/शॉटगन पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन (3P) स्पर्धेत रौप्य पदक ( Swapnil Kusale Won Silver Medal ) आपल्या नावे केले आहे. त्यामुळे भारताला स्पर्धेतील दुसरे पदक मिळाले आहे.
26 वर्षीय स्वप्नीलने आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेतील ( ISSF World Cup ) पहिले वैयक्तिक पदक जिंकले आहे. रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता आणि टोकियो ऑलिम्पिक फायनलमधील युक्रेनच्या सेर्ही कुलिशकडून सुवर्णपदकाच्या लढतीत त्याला 10-16 असा पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या 12 सदस्यीय रायफल संघात भारताकडे आता एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक आहे, जे एका रात्रीत पदकतालिकेत नवव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचले आहे.