महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

नेमबाजी विश्वचषक स्पर्धा : मनु भाकर आणि सौरभने पटकावले सुवर्णपदक, भारत ९ पदकांसह अव्वल - manu saurabh win gold

नेमबाजी विश्वचषक स्पर्धा यामधील अंतिम सामना रोमांचक झाला. या सामन्यात भारतीय मनु भाकर आणि सौरभ चौधरी या जोडीने भारताच्याच यशस्विनी देसवाल आणि अभिषेक वर्माचा १७-१५ ने  पराभव केला. तर दुसरीकडे, १० मीटर एअर रायफल स्पर्धेच्या मिश्र गटात अपूर्वी चंदेला आणि दीपक कुमार यांनी सुवर्णपदक मिळविले. तसेच याच स्पर्धेत भारताच्या अंजुम मौदिगल आणि दिव्यांश पवार यांनी कांस्य पदकाची कमाई केली आहे.

नेमबाजी विश्वचषक स्पर्धा : मनु भाकर आणि सौरभने पटकावले सुवर्णपदक, भारत ९ पदकांसह अव्वल

By

Published : Sep 4, 2019, 5:26 PM IST

रिओ दी जानेरो - ब्राझीलमध्ये सुरु असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीय नेमबाजपटूंनी 'सुवर्ण' कामगिरी केली. स्पर्धेच्या मिश्र गटात १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात भारतीय मनु भाकर आणि सौरभ चौधरी या नेमबाजांनीही 'सुवर्णवेध' घेतला.

'दंगल गर्ल'ने दिली गोड बातमी दिली, लवकरच होणार आई

स्पर्धतील अंतिम सामना रोमांचक झाला. या सामन्यात भारतीय मनु भाकर आणि सौरभ चौधरी या जोडीने भारताच्याच यशस्विनी देसवाल आणि अभिषेक वर्माचा १७-१५ ने पराभव केला. तर दुसरीकडे, १० मीटर एअर रायफल स्पर्धेच्या मिश्र गटात अपूर्वी चंदेला आणि दीपक कुमार यांनी सुवर्णपदक मिळविले. तसेच याच स्पर्धेत भारताच्या अंजुम मौदिगल आणि दिव्यांश पवार यांनी कांस्य पदकाची कमाई केली आहे.

शाळकरी मुलांचा अनोखा 'स्टंट' पाहून ऑलिम्पिक विजेतीसह क्रीडा मंत्रीही दंग

दरम्यान, भारतीय नेमबाजपटूंच्या या कामगिरीच्या जोरावर भारताने पदकतालिकेत पहिले स्थान पटकावले आहे. भारताकडे नऊ पदके असून त्यामध्ये सहा सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य पदकांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details